राक्षसवाडीत वृद्धाचा खून
By Admin | Published: March 10, 2016 12:19 AM2016-03-10T00:19:31+5:302016-03-10T00:52:17+5:30
अंबाजोगाई : पैशाच्या व्यवहारातून एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. ही घटना राक्षसवाडी येथे घडली.
अंबाजोगाई : पैशाच्या व्यवहारातून एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. ही घटना राक्षसवाडी येथे घडली.
बळीराम दाजीबा वाघमोडे (वय ८० रा. राक्षसवाडी ता. अंबाजोगाई) असे मयत वृद्धाचे नाव आहे. गावातीलच रामप्रसाद भीमराव गडदे, अशा रामप्रसाद गडदे यांचा आरोपींत समावेश आहे. गडदे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी वाघमोडे यांना उसणे पैसे दिले होते. ते परत करण्यासाठी गडदे यांचा त्यांच्याकडे तगादा सुरु होता. या व्यवहारातून दोन्ही कुटुंबात अनेकदा कडाक्याची भांडणेही झाली होती.
मंगळवारी सायंकाळी गडदे दाम्पत्य पैसे मागण्यासाठी वाघमोडे यांच्या घरी गेले. त्यांनी उसणे पैसे परत मागितले. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. गडदे दाम्पत्याने बळीराम वाघमोडे यांना काठी व दगडाने मारहाण केली. यावेळी त्यांची पत्नी हौसाबाई धावून आल्या;परंतु त्यांना बाजूला ढकलून बळीराम यांना मारहाण सुरुच होती. हौसाबाई यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पतीला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी हौसाबाई यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण ठाण्यात गडदे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दोघेही फरार आहेत. (वार्ताहर)