जुन्या पेन्शनसाठी घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर, रुग्णांचे हाल

By संतोष हिरेमठ | Published: March 14, 2023 09:20 AM2023-03-14T09:20:54+5:302023-03-14T09:21:10+5:30

घाटीत मेट्रन ऑफिससमोर एकत्र येत परिचारिकांनी मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

Old pension demand Ghati, district hospital nurses on strike, plight of patients | जुन्या पेन्शनसाठी घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर, रुग्णांचे हाल

जुन्या पेन्शनसाठी घाटी, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संपावर, रुग्णांचे हाल

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(घाटी) आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे.

घाटीत मेट्रन ऑफिससमोर एकत्र येत परिचारिकांनी मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने परिचारिका उपस्थित होत्या. संघटनेच्या इंदुमती थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले. महेंद्र सावळे, मकरंद उदयकार, द्रौपदी कर्डीले आदींची यावेळी उपस्थिती होती. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातही परिचारिका संपावर गेल्या आहेत.

Web Title: Old pension demand Ghati, district hospital nurses on strike, plight of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.