OldPension Scheme: पोलिस आयुक्तालयासमोर कर्मऱ्यांची निदर्शने, १०० टक्के कर्मचारी सहभागी

By राम शिनगारे | Published: March 14, 2023 01:40 PM2023-03-14T13:40:48+5:302023-03-14T13:41:14+5:30

पोलिस आयुक्त कार्यालयासमोर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पोलिसेत्तर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

Old Pension Scheme: Demonstration of employees in front of Police Commissionerate | OldPension Scheme: पोलिस आयुक्तालयासमोर कर्मऱ्यांची निदर्शने, १०० टक्के कर्मचारी सहभागी

OldPension Scheme: पोलिस आयुक्तालयासमोर कर्मऱ्यांची निदर्शने, १०० टक्के कर्मचारी सहभागी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्त कार्यालयातील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी सकाळी जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये १०० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

या वेळी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार निदर्शने करीत लक्ष वेधून घेतले. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे पोलिस आयुक्तालयातील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचेही पाहायला मिळाले. निदर्शने केल्यानंतर कर्मचारी घरी निघुन गेले. त्यामुळे मंत्रालयीन कक्षात सर्वत्र शुकशुकाट असल्याचे दिसून आले.

Web Title: Old Pension Scheme: Demonstration of employees in front of Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.