लासूर स्टेशनच्या बाजारात खताचा जुना स्टॉक ४० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:05 AM2021-05-14T04:05:26+5:302021-05-14T04:05:26+5:30
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीचे भाव वाढले आहे तसेच मोलमजुरी वाढली आहे. शेतीच्या पिकासाठी रासायनिक खताची आवश्यकता ...
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीचे भाव वाढले आहे तसेच मोलमजुरी वाढली आहे. शेतीच्या पिकासाठी रासायनिक खताची आवश्यकता आहे. मात्र, सरकारने खताच्या गोणीमागे ६०० रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वातावरण बदलामुळे उत्पादनात घट होत आहे. त्यात शेतकऱ्यांना आणखी आर्थिक संकटात जावे लागणार आहे. परिणामी, शेतीवरील बँकेचे कर्ज फेडणे कठीण झाले आहे. लासूर स्टेशन येथील बाजारपेठेत खताचा जुना स्टॉक ४० टक्के शिल्लक आहे. मात्र काही खताचा जुना स्टॉक संपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जुन्या किमतीतील खत खरेदी करावे, असे खत-बियाणे विक्रेते संदीप ठोळे यांनी सांगितले.
---
अनुदानाची हवी गरज
केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमतीत वाढ होणार असल्याचे जाहीर केले. तर शेतकऱ्यांना खताच्या खरेदीत अनुदान देण्याची गरज आहे. तेव्हाच शेतकरी आर्थिक संकटातून सावरू शकतो.
खताचे नाव : मागील भाव यंदाचे भाव
१०.२६.२६ : ११७५ १७७५
२४.२४.० : १३५० १९००
२०.२०.१३ : ९७५ १४००
१२.३२.१६ : ११८५ १८००