वाळूजला ट्रकने वृद्धेला चिरडले

By Admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:31+5:302016-03-15T01:22:39+5:30

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघात सत्र थांबण्यास तयार नाही. सोमवारी सकाळी भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या आणखी एका अनोळखी ६० वर्षीय महिलेला चिरडले.

The old truck hit the old man | वाळूजला ट्रकने वृद्धेला चिरडले

वाळूजला ट्रकने वृद्धेला चिरडले

googlenewsNext


वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघात सत्र थांबण्यास तयार नाही. सोमवारी सकाळी भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या आणखी एका अनोळखी ६० वर्षीय महिलेला चिरडले. या अपघातात तिचा मृत्यू झाला. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी आठच्या सुमारास नगरकडून औरंगाबादकडे ऊसतोड मजुराचे बैल घेऊन एक ट्रक (क्र. एमएच- १२- ७१६५) भरधाव वेगाने जात होता. वाळूज येथे हा ट्रक पोहोचला. त्यावेळी लायननगरकडून बाजारतळाकडे एक अनोळखी ६० वर्षीय महिला रस्ता ओलांडत होती. त्याच वेळी सुसाट वेगाने आलेली ही ट्रक या महिलेला धडकली. या धडकेने ही अनोळखी महिला दुभाजकाजवळ गंभीर जखमी होऊन पडली.
या अपघाताची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे फौजदार संजय बनकर, पोहेकॉ. बाबासाहेब मोटे, पोकॉ. व्यवहारे, पोकॉ. रवी कुलकुर्णी, पोकॉ. मराठे, पोकॉ. वैष्णव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मग नागरिकांच्या मदतीने त्या अनोळखी महिलेस गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. दरम्यान, या अपघातात मरण पावलेल्या अनोळखी महिलेची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात फरार ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. हिवाळे करीत आहेत.
दरम्यान, या मार्गावर औरंगाबाद ते वाळूज पट्ट्यात गेल्या तीन महिन्यांपासून अपघाताचे सत्रच सुरू आहे. तीन महिन्यांत आठ जणांचा बळी गेला आहे.

Web Title: The old truck hit the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.