ओंकार, गायत्री, भास्कर, माधुरी, अशोक, प्रियदर्शनी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:51 AM2019-03-04T00:51:38+5:302019-03-04T00:52:14+5:30

जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित किडनीथॉनमध्ये १0 कि. मी.मध्ये ओंकार गायकवाड, गायत्री गायकवाड, भास्कर कांबळे, माधुरी निमजे, अशोक अमाने व प्रियदर्शनी पाटील यांनी आपापल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी. अंतरात नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लिंभारे, विठाबाई कच्छवे, राजेश साहू, उषा पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

Omkar, Gayatri, Bhaskar, Madhuri, Ashok, Priyadarshini's tops | ओंकार, गायत्री, भास्कर, माधुरी, अशोक, प्रियदर्शनी अव्वल

ओंकार, गायत्री, भास्कर, माधुरी, अशोक, प्रियदर्शनी अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देकिडनीथॉन : विठाबाई कच्छवे, नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लिंभारे, राजेश साहू, उषा पाटील प्रथम

औरंगाबाद : जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित किडनीथॉनमध्ये १0 कि. मी.मध्ये ओंकार गायकवाड, गायत्री गायकवाड, भास्कर कांबळे, माधुरी निमजे, अशोक अमाने व प्रियदर्शनी पाटील यांनी आपापल्या वयोगटात अव्वल स्थान पटकावले. ५ कि. मी. अंतरात नितीन तालिकोटे, दीपाली तुपे, राम लिंभारे, विठाबाई कच्छवे, राजेश साहू, उषा पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
किडनीथॉनचे निकाल (१0 कि.मी. ४0 वर्षांखालील पुरुष) : १. ओंकार गायकवाड, २. रेहान शेख, ३. समीर कुलकर्णी. महिला : १. गायत्री गायकवाड, २. अमृता गायकवाड, ३. जनाबाई हुलगुंडे. ५0 वर्षांखालील पुरुष : १. भास्कर कांबे, २. संतोष वाघ, ३. भगवान कच्छवे. महिला : १. माधुरी निमजे, २. कविता जाधव, ३. संगीता देशपांडे.
५१ वर्षे (पुरुष) : १. अशोक अमाने, २. सुनीलकुमारसिंग, ३. भारत वाघ. महिला : १. प्रियदर्शिनी पाटील, २. मानसी कागवते, ३. सुनीता एरनाळे. ५ कि. मी. (४0 वर्षांखालील - पुरुष) : १. नितीन तालिकोटे, २. रामेश्वर मुंजाळ, ३. अविनाश दाणे. महिला : १. दीपाली तुपे, २. गीतांजली राऊत, ३. शीतल जाधव. ५0 वर्षांखालील : १. राम लिंभारे, २. विजय शिंपी, ३. हकीम नबी शेख. महिला : १. विठाबाई कच्छवे, २. सुहासिनी शिंदे, ३. सोनम शर्मा. ५१ वर्षे (पुरुष) : १. राजेश साहू, २. केशव मोटे, ३. शेषराव उदार. महिला : १. उषा पाटील, २. मंजू रावत, ३. सुनीता भावे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी सुदृढ जीवनशैलीचे महत्त्व जनमानसात रुजावे यासाठी या किडनीथॉनचे आयोजन युनायटेड सिग्मा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले होते. स्पर्धकांसोबत किडनी प्रत्यारोपण झालेले १५0 रुग्ण व ६४ किडनीदाते यांनी नोंदवलेला सहभाग या किडनीथॉनचे वैशिष्ट्य ठरले. किडनीथॉनमध्ये डॉ. प्रफुल्ल जटाळे दिशादर्शक प्रमुख म्हणून होते. तत्पूर्वी, किडनीथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला महापौर नंदकुमार घोडेले, महावितरणचे प्रादेशिक संचालक ओमप्रकाश बकोरिया, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, वीरजी सफाया, सुरेश माटे, अलोक श्रीवास्तव, यशवंत गाडे, अनंत कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. मनीषा टाकळकर, डॉ. सचिन सोनी, डॉ. सोनाली साबू, डॉ. गणेश बर्नेला, डॉ. अजय रोटे, डॉ. श्वेता बर्नेला उपस्थित होते.

Web Title: Omkar, Gayatri, Bhaskar, Madhuri, Ashok, Priyadarshini's tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.