छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:32 PM2024-07-16T16:32:14+5:302024-07-16T16:42:50+5:30

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने १६ जुलै रात्री ८ ते १७ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल केला आहे.

On the occasion of Ashadhi tomorrow, there will be a change in the traffic on the Chhatrapati Sambhajinagar-Ahmednagar highway, the alternative route will be... | छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

वाळूज महानगर : छोटे पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने १६ जुलै रात्री ८ ते १७ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल केला आहे.

हे मार्ग बंद :
- छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. एएस क्लब चौक ते कामगार चौकापर्यंत रस्ता पूर्णत: सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. तिरंगा चौक पंढरपूर ते आंबेडकर चौक (एफडीसी कॉर्नर) रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. नगर महामार्गावरील नगर नाका ते ए एस क्लब चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद असेल.

असा असेल पर्यायी मार्ग...
- जालना/बीडकडून अहमदनगर-पुण्याकडे जाणारी अवजड वाहने ही महानुभाव आश्रम चौक, लिंक रोडपासून पुढे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळे हायवे मार्गे साजापूर फाटा, एनआरबी चौक, एफडीसी कॉर्नर, कामगार चौक मार्गे पुढे जातील.
- जालना/बीडकडून अहमदनगर-पुण्याकडे जाणारी हलकी वाहने नगर नाका, मिटमिटा, तीसगाव चौफुली, वडगाव कोल्हाटी, सारा सार्थक, शनी मंदिर, कार्तिक हॉटेल, रांजणगाव फाटा, एफ.डी.सी. कॉर्नर, कामगार चौक मार्गे वाळूजहून पुढे जातील,
-जालना/बीड/जळगावकडून धुळे, नाशिककडे जाणारी वाहने लिंक रोड किंवा वाल्मी नाका, राष्ट्रीय महामार्ग नवीन सोलापूर-धुळे हायवे मार्गाने पुढे जातील व येतील.
- छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने नगर नाका, मिटमिटा, तिसगाव चौफुली, वडगाव कोल्हाटी, महाराणा प्रताप चौक, एफ.डी.सी. कॉर्नर, कामगार चौक मार्गे जातील किंवा साजापूर गावातून एनआरबी चौक रांजणगाव-एफडीसी कॉर्नर-कामगार चौकमार्गे पुढे जातील.
- पुणे-अहमदनगरकडून जालना-बीडकडे जाणारी अवजड वाहने ही ईसारवाडी, बिडकीनमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील.
- पुणे-अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगर शहरात येणारी हलकी वाहने पाटोदा टी-पॉइंटमार्गे संताजी चौकी, वाल्मी नाका, महानुभाव चौकमार्गे पुढे जातील.
- पुणे-अहमदनगरकडून धुळे-नाशिककडे जाणारी हलकी वाहने पाटोदा टी-पॉइंटमार्गे संताजी चौकी, वाल्मी नाका मार्गे राष्ट्रीय महामार्ग नवीन सोलापूर- धुळे हायवे मार्गे पुढे जातील.

वाहनधारकांना सूचना
बंदोबस्तावर असणारे पोलिस अधिकारी आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील, विशेष म्हणजे ही अधिसूचना पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही, या अधिसूचनेचा भंग करणाऱ्याविरोधात विविध कायद्यांन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी सूचना वाहतूक शाखेकडून जाहीर करण्यात आली आहे.

Web Title: On the occasion of Ashadhi tomorrow, there will be a change in the traffic on the Chhatrapati Sambhajinagar-Ahmednagar highway, the alternative route will be...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.