उपायुक्तांच्या घरात दीड किलो सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:06 AM2017-10-28T01:06:44+5:302017-10-28T01:06:48+5:30

लिपिकामार्फत एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेला महानगरपालिकेचा महसूल उपायुक्त अय्युब खान नूरखान पठाण याच्या घरात दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५० रुपयांची रोकड अन् विविध बँक खात्यांचे पासबुक आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली.

One and half kg gold found at deputy commissioners' house | उपायुक्तांच्या घरात दीड किलो सोने

उपायुक्तांच्या घरात दीड किलो सोने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लिपिकामार्फत एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेला महानगरपालिकेचा महसूल उपायुक्त अय्युब खान नूरखान पठाण याच्या घरात दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५० रुपयांची रोकड अन् विविध बँक खात्यांचे पासबुक आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली.
याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक किशोर चौधरी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोजंदारीवरील कनिष्ठ लिपिकास सेवेत कायम करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मनपातील आस्थापना विभागाचा उपायुक्त (महसूल) अय्युब खान याने तीन लाख रुपये लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून वरिष्ठ लिपिक दादाराव लाहोटी याच्यामार्फत २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी स्वीकारले. याप्रकरणी आरोपीविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईनंतर पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याचा टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील बंगल्याची झडती घेतली. रात्रभर चाललेल्या या झडतीत घरात दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५० रुपयांची रोकड हाती लागली. यासोबतच दोन बँकखात्यांचे पासबुक आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली. याशिवाय त्याचे बँक लॉकर असावे, असे पोलिसांना वाटते; परंतु त्याबाबतची माहिती मिळाली नाही.
चार पथकांनी केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्त खान आणि वरिष्ठ लिपिक लाहोटी यांच्यावरील कारवाईसाठी चार पथके पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी नेमली. या पथकापैकी एक पथक मनपात, दोन पथके अय्युब खानच्या कार्यालयाबाहेर तर चौथे पथक अय्युब खानच्या बंगल्याबाहेर उभे होते. सापळा यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी अय्युब खानच्या बंगल्यावर धडक मारली. अय्युब खान यास पकडल्यानंतर साध्या वेशातील पोलीस अधिकारी कर्मचा-यांनी त्याच्या बंगल्यावर धडक मारली. यावेळी अय्युब खानच्या नातेवाईकांनी पोलिसांना बंगल्यात प्रवेश नाकारला. त्यावेळी पोलिसांनी अय्युब खानला लाच घेताना पकडल्याचे सांगून घरझडतीच्या कारवाईसाठी एसीबीला सहकार्य करण्याचे सांगितले. तेव्हा त्यांना हे खरे पोलीस आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.
यामुळे शेवटी पोलिसांनी एसीबीच्या अन्य अधिका-यांच्या फोनवर संपर्क साधून अय्युब खानला बोलण्यास सांगितले. तेव्हा अय्युब खानने त्यांना पोलिसांना सहकार्य करण्याचे कळविल्याचे सूत्रांकडून समजले. खान याच्या बंगल्याच्या झडतीत पोलिसांच्या हाती लागलेल्या सोन्या-चांदीचे अलंकाराचे वजन करून त्याचे मूल्य निश्चित करण्यासाठी एसीबीने शहरातील एका ज्वेलर्सला पाचारण केले.

Web Title: One and half kg gold found at deputy commissioners' house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.