रांजणगावमध्ये दीड हजार विद्युत मोटारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:32 IST2019-04-20T00:32:36+5:302019-04-20T00:32:45+5:30
गावात सर्वांना समान पाणी पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून मोटारी जप्तीची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दीड हजार विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

रांजणगावमध्ये दीड हजार विद्युत मोटारी जप्त
वाळूज महानगर : रांजणगावात पाणी पुरवठा केल्यानंतर काही नागरिकांकडून विद्युत मोटारी लावून पाणी घेतले जात आहे. त्यामुळे अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात सर्वांना समान पाणी पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून मोटारी जप्तीची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दीड हजार विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पाणीपातळी खालावली आहे. त्यातच एमआयडीसीकडून पाण्याच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रांजगणावातील अनेक नागरी वसाहतींत पाण्याची बिकट समस्या आहे. नवीन वसाहतीत तर पाण्याचा ठणठणाट सुरु आहे. ग्रामपंचायतीकडून आठवड्यातून एक ते दोनवेळा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही काही नागरिक नळाला विद्युत मोटारी लावून अधिकचे पाणी घेत आहेत.
त्यामुळे इतर वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ही बाब लक्षात घेवून ग्रामपंचायतीने विद्युत मोटारीने पाणी घेणाºया नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामपंचायतीकडून विद्युत मोटारी जप्तीची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमुळे समान पाणी होण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.