७० हजार रुपयांच्या लाचेच्या गुन्ह्यात अव्वल कारकुनासह एकाला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:04 AM2021-07-15T04:04:11+5:302021-07-15T04:04:11+5:30
चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चार वर्षांनंतर गजाआड औरंगाबाद : चार वर्षांपूर्वी खिडकीचे ग्रील व जाळी तोडून कपाटातील ६५ ...
चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी चार वर्षांनंतर गजाआड
औरंगाबाद : चार वर्षांपूर्वी खिडकीचे ग्रील व जाळी तोडून कपाटातील ६५ हजारांचे दागिने चोरून फरार झालेला आरोपी शंकर तान्हाजी जाधव याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
---------------------------------------------------
एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी
औरंगाबाद : बेडरूमच्या उघड्या दारातून घरात प्रवेश करून एक लाख १० हजार रोख रक्कम आणि चार मोबाईल असा सुमारे एक लाख ३० हजारांचा ऐवज चोरणारे निसार कौसर खान, अभिषेक राजू वाघमारे, अमन फिरोज शेख आणि राहुल विनायकराव ससाणे या चौघांना १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-------------------------------------------------
११ महिन्यांनंतर मंगळसूत्र चोर पकडला
औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या ६२ वर्षांच्या वृद्धेची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावणारा चोरटा वैभव गजानन इंगोले याला तब्बल ११ महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली. त्याला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
----------------------------------------------------
जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पोलीस कोठडी
औरंगाबाद : शेतातील सामायिक बांधावरून चुलत भावानेच भावासह त्याची पत्नी व मुलाला फावडे आणि सळईने जबर मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मनोहर विठ्ठल गाडेकर आणि त्याचा मुलगा सुरेश मनोहर गाडेकर या दोघांना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. सपाटे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
----------------------------------------------------
दोन तरुणांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघांना जामीन नाकारला
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंप्री (वरुड) येथील दोन तरुणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात शेख मोईन मोहम्मद सुभान, मुस्ताक गफुरखान पठाण आणि मनीषा संजय काळे या तिघांचा नियमित जामीन अर्ज सत्रन्यायाधीश ए. आर. कुरेशी यांनी बुधवारी नामंजूर केला. सरकारतर्फे सहायक लोकअभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
-----------------------------------------------------
परप्रांतीय दोघे मोबाईल चोरटे तुरुंगात रवाना
औरंगाबाद : नारळीबाग परिसरातून मोबाईल चोरणारे तामिळनाडू राज्यातील कार्तिक श्रीनिवास आणि गुना बाबू गोपाल या दोघांची न्यायालयीन कोठडीत हर्सुल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी बुधवारी दिले.