लग्नासाठी विधवेची खरेदी करणाऱ्याच्या गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 06:43 PM2020-02-11T18:43:01+5:302020-02-11T18:45:23+5:30

या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. 

one arrested from Gujarat who who bought the widow a wedding | लग्नासाठी विधवेची खरेदी करणाऱ्याच्या गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या

लग्नासाठी विधवेची खरेदी करणाऱ्याच्या गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या

googlenewsNext
ठळक मुद्देजिन्सी पोलिसांची कारवाईमुलीवर केला होता अत्याचार

औरंगाबाद : लग्नासाठी विधवेची खरेदी केल्यानंतर तिला भेटायला आल्यानंतर १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिन्सी पोलिसांनी गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात सोमवारी शिताफीने बेड्या ठोकल्या. या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. 

नीलेश दादाभाई  पटेल (३०, रा. पिलवाई, जि. मेहसाना, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. केटरिंग कामासाठी गुजरातमध्ये महिलेला नेऊन तेथे तिची दीड लाखात विक्री करणाऱ्या टोळीचा पीडितेने ३१ जानेवारी रोजी पर्दाफाश केला होता. जिन्सी पोलिसांनी योगेश कैलास बोरसे आणि सय्यद फरजाना आणि अन्य सय्यद जैनब यांना दुसऱ्या दिवशी अटक केली होती. शहरातील विधवेला केटरिंगच्या कामाच्या निमित्ताने गुजरातमध्ये नेऊन आरोपींनी नीलेश पटेल याला तिची दीड लाख रुपयांत विक्री केली होती. २०१७ मध्ये हा प्रकार झाला होता. नीलेशने पीडितेला गुंगीचे औषध पाजून बळजबरीने तिच्याशी लग्न केले होते. नीलेशपासून पीडितेला एक मुलगाही झाला. दरम्यान, पीडितेची १६ वर्षीय मुलगी तिला भेटण्यासाठी गुजरातमध्ये गेली होती. तेथे आरोपीने पीडितेच्या मुलीवरही बलात्कार केला. याची माहिती मिळाल्यानंतर पीडिता मुलीसह औरंगाबादला परतली आणि तिने जिन्सी ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडितेला नराधम नीलेश पटेल याच्या स्वाधीन करणाऱ्या तीन आरोपींना १ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती.दरम्यान, पोलिसांनी सोमवारी नीलेश पटेल याच्या गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील पिलवाई येथे मुसक्या आवळल्या.

दोन विवाहांची कबुली
आरोपी नीलेश पटेलने दीड लाखात औरंगाबादेतील विधवेला खरेदी केले होते. अशा प्रकारे त्याने दोन महिलांची खरेदी केल्याची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वत:च्या घरात १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केले होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर, घटनास्थळाचा पंचनामा के ल्यानंतर त्याला औरंगाबादेत आणले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी दिली. 

Web Title: one arrested from Gujarat who who bought the widow a wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.