४४ वसतिगृहांना एक कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:06 AM2021-01-25T04:06:51+5:302021-01-25T04:06:51+5:30
सोनखेडा उपकेंद्राचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा आरोग्य उपकेंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याप्रकरणी स्ट्रक्चरल ...
सोनखेडा उपकेंद्राचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा आरोग्य उपकेंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल आल्यावर कंत्राटदारावर कारवाईचे निर्देश आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिले आहे.
नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरू करा
औरंगाबाद : वाळूज येथील आरोग्य केंद्रात आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन नाॅनकोविड उपचार तिथे सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. यावर लवकरच येथे आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्या जाणार असून, नव्या भरतीत आवश्यक मनुष्यबळही पुरवण्यात येईल, असे आरोग्य सभापतींनी सांगितले.
दोन आरोग्य केंद्र, तीन उपकेंद्राचा ठराव
औरंगाबाद : खंडाळा, वीरगाव येथे नवीन आरोग्य केंद्र तर भिंदोन, मुरुमखेडा, मांगेगाव येथे नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याचा ठरावा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
पशुवैद्यकीय दवाखान्यांना ६१ लाख
औरंगाबाद : जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी ६१ लाख रुपयांची जीवनरक्षक औषधी खरेदी करण्यास सुधारित मान्यता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने दिली आहे.