एक कोटीची जागा मनपाच्या ताब्यात
By Admin | Published: September 7, 2016 12:15 AM2016-09-07T00:15:02+5:302016-09-07T00:38:48+5:30
औरंगाबाद : ज्योतीनगर भागातील रोहिणीनगर येथील ५ हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून त्याची परस्पर विक्री करण्याचा घाट काही
औरंगाबाद : ज्योतीनगर भागातील रोहिणीनगर येथील ५ हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून त्याची परस्पर विक्री करण्याचा घाट काही भूखंड माफियांनी घातला होता. या भागातील लोकप्रतिनिधी शिल्पाराणी वाडकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वारंवार प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करीत तब्बल १ कोटी रुपयांची जागा ताब्यात घेतली.
रोहिणीनगर येथील मनपाच्या जागेवर काही वर्षांपूर्वी अतिक्रमण करण्यात आले. महापालिका प्रशासन या जागेकडे लक्ष देत नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांनी परस्पर पी.आर. कार्डवर नावही टाकून घेतले. पी.आर. कार्डवर प्लॉट क्रमांक टाकण्याची प्रक्रिया शिल्लक होती. या भागातील नगरसेविका वाडकर यांनी मनपाकडे यासंदर्भात वारंवार तक्रार केली.
मनपा अधिकारी कारवाईचे फक्त नाटक करीत होते. यापूर्वी अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी मनपाचे अधिकारी घटनास्थळावर गेले. मात्र, अतिक्रमण करणाऱ्याने स्वत:हून दोन खोल्या पाडून टाकल्या. आणखी एक खोली ५ हजार चौरस फूट जागेवर बांधलेली होती.
बाजारभावानुसार या जागेची किंमत किमान १ कोटी रुपये आहे. मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेत वाडकर यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रशासनाने नगररचना विभागाचा अभिप्राय घेतला.
४मालमत्ता विभागाचे अधिकारी शेख शफी यांचा अभिप्राय घेतला. उपायुक्त रवींद्र निकम यांनी त्वरित अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. सायंकाळी इमारत निरीक्षक राचतवार यांनी कारवाई करीत अतिक्रमण जमीनदोस्त केले. १ कोटी रुपयांची संपूर्ण जागा मालमत्ता विभागाने ताब्यात घेतली.