औरंगाबाद विमानतळावर तस्करीचे १ कोटीचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:09 PM2018-11-14T12:09:55+5:302018-11-14T12:16:11+5:30

दिल्लीहून आलेल्या विमानातील दोन तस्करांकडून सुमारे एक कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. 

One crores smuggling gold seized in Aurangabad airport | औरंगाबाद विमानतळावर तस्करीचे १ कोटीचे सोने जप्त

औरंगाबाद विमानतळावर तस्करीचे १ कोटीचे सोने जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देअबुधाबीहून आणली होती ३ किलो सोन्याची बिस्किटेतस्करी करणारे दोन जण ताब्यात शहरातील पहिलीच मोठी कारवाई

औरंगाबाद  : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री दिल्लीहून आलेल्या विमानातील दोन तस्करांकडून सुमारे एक कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. दिल्लीहून रात्री ८ वाजता औरंगाबादला आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील शेख जावेद आणि अब्दुल फईम (रा. मुंबई) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सुमारे एक कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्याची ही औरंगाबादेतील पहिलीच वेळ आहे. 

कस्टमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जावेद आणि शेख फय्युम यांनी अबुधाबीवरून ही सोन्याची बिस्किटे आणल्याची माहिती मिळाली. मुंबई कस्टमच्या अधिकाऱ्यांना हे दोन प्रवासी औरंगाबादमध्ये सोने घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून कस्टमचे अधिकारी औरंगाबादमध्ये आधीच येऊन थांबले होते. ही माहिती पक्की करण्यासाठी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी केंद्रीय जीएसटीच्या अधिकाऱ्यांची, त्याचप्रमाणे महसूल विभागाचीही मदत घेतली होती. 

रात्री विमानतळावर दोन्ही सोनेतस्कर उतरले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दोघांच्या बॅग्जची तपासणी केली असता त्यामध्ये हे सोने आढळले. ८ वाजेपासून ते रात्री १२.३० वाजेपर्यंत या प्रकरणात दोघांची चौकशी चालू होती. या चौकशीदरम्यान विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी वगळता कुणालाही विमानतळाच्या आतील बाजूस प्रवेश देण्यात आला नाही. 

शहरात या घटनेची माहिती कळताच माध्यमांचे प्रतिनिधी विमानतळावर धावले. विमानतळाच्या आतील भागात दोघांची चौकशी चालू होती. काही वेळाने सोनेतस्करीची माहिती मिळाली. आधीच्या माहितीनुसार दहा कोटी रुपयांची बिस्किटे असल्याचे समजले. मात्र, नंतर ही बिस्किटे तीन किलो वजनाची व सुमारे एक कोटी रुपयांची असल्याचे समोर आले. औरंगाबादमध्ये मंगळवारी सोन्याचा दर हा ३२ हजार १०० रुपये इतका होता. या आकडेवारीनुसार या सोन्याची किंमत सुमारे ९६ लाख रुपयांपेक्षाही अधिक होत आहे. 

शेख जावेद आणि शेख फय्युम हे दोघे औरंगाबादमध्ये कुणासाठी सोने घेऊन आले होते किंवा कुणाकडे ते सोपविणार होते, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र, या दोघांनी आणलेले सोने हे तस्करी करून आणल्याचे समोर येत आहे. कस्टम कायद्याखाली या दोघांवर कारवाई होणार असून, ते दोघे कस्टम अधिकाऱ्यांच्याच ताब्यात राहणार आहेत.

अशी लपविली बिस्किटे
या दोन तस्करांनी एका बिस्किटाचे चार तुकडे करून ती सर्व बिस्किटे एका बॅगमध्ये लपविली होती. बिस्किटाचे तुकडे पॅक करून त्याचा रोल तयार करण्यात आला होता. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांना या दोघांकडे सोने असल्याची पक्की खात्री असल्याने या दोघांची तपासणी केली असता तस्करी उघडकीस 

दोन्ही गेट केले बंद
सोनेतस्करांची चौकशी चालू असताना विमानतळ प्राधिकरणाकडून जालना रस्त्यावरील दोन्ही मुख्य गेट बंद करण्यात आले होते. रात्री ८ वाजता औरंगाबाद शहरात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना बाहेर जाऊ दिल्यानंतर हे गेट बंद करण्यात आले.

कस्टमचा नियम 
कस्टमच्या नियमानुसार विदेशातून एका पुरुषाला २० हजारांचे, तर महिलेला ४० हजार रुपयांचे सोने आपल्यासोबत आणता येते. त्यापेक्षा जास्त सोने आणण्यास मनाई आहे. असे सोने आणल्यास ते जप्त करण्यात येते व कस्टम विभाग नंतर त्याचा लिलाव करून तो पैसा सरकार दरबारी जमा केला जातो. यामुळे आता शेख जावेद आणि अब्दुल फईम या दोन तस्करांकडून जप्त केलेल्या सोन्याचाही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लिलाव होईल. 

Web Title: One crores smuggling gold seized in Aurangabad airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.