एकीकडे चालक- वाहकांना अभ्यंगस्नान; दुसरीकडे आगारासमोर पुन्हा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 08:49 AM2021-11-04T08:49:14+5:302021-11-04T09:00:36+5:30

ST worker agitation:काही कर्मचारी आंदोलनात उतरले आणि कर्तव्यावर जाण्यास नकार दिला.

On the one hand the driver-carrier Abhyangasnan; On the other hand, agitation again in front of the cidco bus depot | एकीकडे चालक- वाहकांना अभ्यंगस्नान; दुसरीकडे आगारासमोर पुन्हा आंदोलन

एकीकडे चालक- वाहकांना अभ्यंगस्नान; दुसरीकडे आगारासमोर पुन्हा आंदोलन

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या दिवशी सिडको बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे सिडको बसस्थानकातील बससेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने बसस्थानकाच्या आगार समोर जमलेले आहेत. 

कुटुंबापासून दूर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या जल्लोषापासून मुकावे लागते. अभ्यंगस्नानही कर्मचाऱ्यांच्या नशिबी नसते. मात्र, ही उणीव भरून काढत एसटी प्रशासनातर्फे गुरुवारी पहाटे एसटीच्या सिडको बसस्थानकात दिवाळी साजरी करण्यात आली. विश्रांतीगृहातील कर्मचाऱ्यांना उटणे, सुगंधी तेल, साबण, अंघोळीला गरम पाणी आणि फराळ दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

पण त्याच वेळी काही कर्मचारी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात घ्यावे या मागणीसाठी पुन्हा आंदोलनात उतरले आणि कर्तव्यावर जाण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी शहर बस बरोबर एसटी बसची सेवा विस्कळीत होत आहे. कर्मचाऱ्यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

Web Title: On the one hand the driver-carrier Abhyangasnan; On the other hand, agitation again in front of the cidco bus depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.