आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या संपास शंभर टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:03 AM2021-06-16T04:03:51+5:302021-06-16T04:03:51+5:30
कोरोना काळात नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे राबविले जात आहे, परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. उलट त्यांना अधिकारी काढून टाकण्याची ...
कोरोना काळात नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे राबविले जात आहे, परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. उलट त्यांना अधिकारी काढून टाकण्याची धमकी देतात तर सर्वेक्षणाला गेल्यावर अनेकदा त्यांच्यावर हल्लेही झाले आहेत, याचा निषेध या संपाव्दारे करण्यात येत आहे.
आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना किमान वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात हा संप सुरू झाला आहे.
कोविड काळात सक्षम व समर्थपणे सेवा देणाऱ्या या कामगारांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले. मात्र, त्यांना गरजेपुरताही मोबदला दिला जात नाही, असे सीटू प्रणित आशा वर्कर्स संघटनेच्या नेत्या मंगल ठोंबरे यांनी सांगितले.
आज सकाळपासूनच सीटू भवन येथे आशा वर्कर व गटप्रवर्तक एकत्रित जमले. नंतर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
आशा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान २२ हजार रुपये वेतन द्यावे, अशी आग्रहाची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दामोदर मानकापे, लक्ष्मण साक्रुडकर, पुष्पा सिरसाट, मीरा जाटवे, पुष्पा पैठणे, संगीता जोशी, पुष्पा काळे, सुनीता दाभाडे, सुवर्णा सिरसाट आदी या संपाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
कॅप्शन... सीटू भवन येथे जमलेल्या आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांनी एकत्र येत मागण्यांविषयी एल्गार पुकारण्यात आला.