धनादेश अनादर प्रकरणी एकास कारावास
By Admin | Published: April 1, 2017 12:17 AM2017-04-01T00:17:43+5:302017-04-01T00:20:56+5:30
उस्मानाबाद : धनादेश अनादर प्रकरणी एका आरोपीस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक महिना कारावास व ७० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़
उस्मानाबाद : धनादेश अनादर प्रकरणी एका आरोपीस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक महिना कारावास व ७० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदही सुनावली़
याबाबत अॅड़ आऱएस़मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पवनराजे लोकसमृध्दी मल्टिस्टेट को-आॅप क्रेडीट सोसायटीकडून नारायण किसन जगताप (रा़ उस्मानाबाद) यांनी २७ मे २०१४ रोजी ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते़ या कर्जाची परतफेड करण्यासाठी जगताप यांनी ३१ मार्च २०१५ रोजी बँकेला ५९ हजार ३१७ रूपयांचा वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा धनादेश दिला होता़ हा धनादेश १२ जून २०१५ रोजी अनादरित झाला़ त्यामुळे मल्टिस्टेटच्या वतीने अॅड़ आऱएस़मुंढे यांच्या मार्फत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात नि़ई़अॅक्ट चे कलम १३८ अन्वये प्रकरण दाखल केले होते़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे व अॅड़ रमेश मुंढे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश ए़सी़पारशेट्टी यांनी आरोपी नारायण जगताप यांना एक महिना कारावास व ७० हजार रूपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावल्याचे अॅड़ मुंढे यांनी सांगितले़ अॅड़ मुंढे यांना अॅड़ प्रशांत लोंढे, अॅड़ वेदकुमार शेलार यांनी सहकार्य केले़