तीन वेगवेगळ्या अपघातांत एक ठार, सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:02 AM2021-09-21T04:02:12+5:302021-09-21T04:02:12+5:30

आडूळ : अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरात दुचाकीच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले, तर एक जण ...

One killed, six injured in three separate accidents | तीन वेगवेगळ्या अपघातांत एक ठार, सहा जण जखमी

तीन वेगवेगळ्या अपघातांत एक ठार, सहा जण जखमी

googlenewsNext

आडूळ : अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरात दुचाकीच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले, तर एक जण ठार झाला. धुळे सोलापूर महामार्गावरील भालगाव फाटा ते पांढरी व पिंपळगाव फाट्यादरम्यान रविवारी (दि.१९) दुपारी ही घटना घडली. रोहन सुभाष आगलावे (२०, रा.पांढरी, ता.जि.औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मित्राचा वाढदिवस असल्याने, रोहन दुचाकी घेऊन रविवारी सायंकाळी सांजखेडा रस्त्यालगत असलेल्या मित्राच्या घरी गेला. वाढदिवसाचा केक कापून तो पुन्हा घरी जाण्यासाठी निघाला. दरम्यान, पिंपळगाव फाट्यावर औरंगाबादकडून भरधाव वेगाने आडूळ गावाकडे जाणाऱ्या कारने (क्र. एमएच २० सीएच ४३७०) रोहनच्या दुचाकीला (क्र. एमएच २० सीए ३१९७) जोराची धडक दिली. यात रोहन व कारमधील तीन जण जखमी झाले. जखमींना औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान रोहनचा झाला. करमाड पोलीस ठाण्यात घेण्यात आली.

दुसरी घटना भालगाव फाटा येथे घडली. मन्सुरखा महेबुबखा पठाण (६०, रा.आडूळ बु,) हे एकटेच आडूळवरून कुंभेफळ येथे मोसंबी बागेची फळे तोडण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच २० एएक्स २१०९) रविवारी दुपारी निघाले होते. त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (क्र. एमएच ४४ बी २४०७) भालगाव फाट्यावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात मन्सुरखा पठाण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथे सध्या उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात झाली.

तिसरी अपघाताची घटना पिंपळगाव शिवारात घडली. दुचाकीवर मागे बसलेली एक महिला व तिचे बाळ अचानक खाली पडल्याने दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सपोनि.प्रशांत पाटील, बिट जमादार रंजीत दुलत, विनोद खिल्लारे, सुनील गोरे, शेख आवेज यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.

---

आई-वडिलांचा तो एकटाच होता

मित्राचा वाढदिवस असल्याने पिंपळगाव फाटा येथे केक कापून आपल्या लाडक्या मित्राला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, घरी परतत असताना, काळाने रोहनवर घाला घातला. त्यांच्यापश्चात आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर पांढरी येथे सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

----

फोटो : कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीची झालेली दुरवस्था.

200921\img-20210919-wa0079.jpg

औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर कारने दुचाकीला धडक दिल्याने रोहन आगलावे या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या दुचाकीचा अशी अवस्था झाली.

Web Title: One killed, six injured in three separate accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.