तीन वेगवेगळ्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:49 AM2017-08-25T00:49:14+5:302017-08-25T00:49:14+5:30

पाणीपुरवठ्याच्या फेºया पूर्ण करण्याच्या घाई गडबडीत भरधाव ट्रॅक्टरने मोपेडस्वार वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीला उडविल्यानंतर २५ ते ३० फूट फरपटत नेले.

One killed in three different accidents | तीन वेगवेगळ्या अपघातात एक ठार

तीन वेगवेगळ्या अपघातात एक ठार

googlenewsNext

भरधाव ट्रॅक्टरने मोपेडस्वार विद्यार्थिनीला फरपटत नेले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याच्या फेºया पूर्ण करण्याच्या घाई गडबडीत भरधाव ट्रॅक्टरने मोपेडस्वार वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीला उडविल्यानंतर २५ ते ३० फूट फरपटत नेले. या भीषण घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. हा अपघात गुरुवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिडकोतील केंद्रीय जीएसटी कार्यालयासमोर घडला.
पायल वसंत राठोड (२०, रा. तोरणागडनगर, एन-२ सिडको) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. गुलमोहर कॉलनीतील फोस्टर होमिओपॅथिक कॉलेजमध्ये ती बीएचएमएसच्या द्वितीय वर्षाला शिकते. ती मैत्रिणीसह महाविद्यालयात परीक्षा फॉर्म भरण्यासाठी गेली होती. मैत्रिणीला सिडकोतील तिच्या घरी सोडल्यानंतर पायल मोपेडवरून (क्र. एमएच-२० सीव्ही ७७३) घरी जात होती. कॅनॉट प्लेसमधील केंद्रीय जीएसटी कार्यालयासमोरून (जुने केंद्रीय सीमा शुल्क कार्यालय) ती जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मनपाच्या पाणीपुरवठा करणाºया ट्रॅक्टरच्या (क्र. एमएच-२१ एएम १३६९) आणि ट्रॉलीने (क्र.एमएच-२० डीई ९५४२) तिच्या मोपेडला जोराची धडक दिली. धडकेनिशी ती मोपेडसह ट्रॅक्टरच्या मागील मोठ्या चाकात अडकली. प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरड करताच ट्रॅक्टरचालकाने पळून जाण्यासाठी वेग वाढविल्याने सुमारे २५ ते ३० फुटांपर्यंत पायलला त्याने फरपटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅक्टरच्या चाकाखाली फरपटत गेल्याने पायलचे रक्त डांबरी रस्त्यावर जागोजागी सांडले होते. शिवाय तिची बॅग आणि अन्य वस्तूही रक्ताने माखल्या होत्या.
सेव्हन हिल पुलावर
भरधाव कारचा थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दुपारी दोनची वेळ. सिडको बसस्थानकाकडून एक कार भरधाव वेगाने क्रांतीचौकाकडे जात होती. सेव्हन हिल उड्डाणपुलाला सुरुवात होताच कारचा वेग वाढला. मात्र, कारचालक युवकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार डाव्या साइटच्या कठड्यावर आदळली. तेथून थेट उजव्या साइटच्या डिव्हायडरवर धडकली. कारचा वेग खूप असल्यामुळे पुन्हा कार डाव्या साइटच्या कठड्यावर जाऊन आदळली. तेथून युटर्न घेत थेट रस्त्यावरच आडवी झाली. डाव्या साइटचा कठडा मजबूत असल्यामुळे कार थेट उड्डाणपुलावरून खाली जाण्याऐवजी रस्त्यावर आडवी झाली. दुसरे वाहन मागेपुढे नव्हते. यामुळे इतर वाहनांचा अपघात टळला. याचवेळी गाडीचा वेग आणि जोरदार धडकेमुळे एअर बॅग उघडल्यामुळे आतमधील दोन युवक बालंबाल बचावले. अपघाताविषयी चालक मुलाला विचारले असता, त्याने ‘रिप्ले कर के बताऊ क्या’ असे उद्धटपणाचे उत्तर दिले.
पंढरपुरात टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी (दि.२४) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
मनोज शिवाजी नेमाणे (२४, रा. सिरेसायगाव, ता.गंगापूर) हा तरुण नवीन विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पंढरपुरातील महावीर चौकातून वळण घेऊन बजाजनगरकडे जात असताना पाठीमागून भरधाव येणाºया आयशर टेम्पोने (क्र. एमएच-२० सीटी ८६३७) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात मनोज गंभीर जखमी झाला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून मनोजला मृत घोषित केले.
वाळूज एमआयडीसी ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मृत मनोज नेमाणे याचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून, त्यास एक मुलगा आहे. दोन महिन्यांपूर्वी मनोज वाळूज एमआयडीसीत एका कंपनीत कामाला लागला होता.
गुरुवारी सकाळी कामाला जाण्यासाठी तो एमआयडीसीत आला असताना हा अपघात झाल्याचे मनोजचे मेव्हणे कल्याण आवारे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सविता तांबे, पोहेकॉ. सुखदेव भागडे यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: One killed in three different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.