एक किलोमीटरच्या अदालत रोडचे वाटोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:30 AM2017-10-13T00:30:45+5:302017-10-13T00:30:45+5:30

क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे पूर्णत: चाळणी झालेली आहे

One-kilometer Adalat road damaged | एक किलोमीटरच्या अदालत रोडचे वाटोळे

एक किलोमीटरच्या अदालत रोडचे वाटोळे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे पूर्णत: चाळणी झालेली आहे. साडेसहा कोटी रुपयांची निविदा दीड वर्षापासून मंजूर असतानाही केवळ नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) जालना रोडचे रुंदीकरण करणार, या आशेपोटी त्या रस्त्याचे काम पालिका करीत नाही. परिणामी नागरिकांना खड्ड्यांमुळे होणाºया असह्य त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
२४.३३ कोटींचा निधी शासनाने पालिकेला दिला. त्यामध्ये क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्याच्या मजबुतीकरणाचा समावेश करून साडेसहा कोटींचा निधी ठेवण्यात आला. जालना रोडचा महत्त्वाचा भाग असलेला तो १ कि़ मी. चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही. त्यामुळे बांधकाम विभाग जालना रोडची डागडुजी करताना त्या १ कि़ मी. अंतराची डागडुजी करीत नाही. मनपाने दीड वर्षापासून त्या रोडवरील खड्डे भरलेले नाहीत. या पावसाळ्यात उड्डाणपुलासह महावीर चौकापर्यंत पूर्ण रस्ता खराब झाला आहे. एनएचएआयने बीड बायपास, जालना रोडच्या रुंदीकरणाच्या निविदा दिल्ली मुख्यालयाला पाठवून १९ सप्टेंबर रोजी १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्या निविदांवर काहीही निर्णय होत नाही. उलट ८०० कोटींचा तो प्रकल्प ४०० कोटींवर आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थितीत मनपा क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंतचा रस्ता दुरु स्त करून घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

Web Title: One-kilometer Adalat road damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.