निवडणूक खर्चात एक लाखाची वाढ

By Admin | Published: February 6, 2017 10:53 PM2017-02-06T22:53:15+5:302017-02-06T22:57:34+5:30

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत निवडणूक आयोगाने एक लाख रुपयांनी वाढ केली आहे़

One lac increase in election expenditure | निवडणूक खर्चात एक लाखाची वाढ

निवडणूक खर्चात एक लाखाची वाढ

googlenewsNext

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत निवडणूक आयोगाने एक लाख रुपयांनी वाढ केली आहे़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना चार लाख तर पंचायत समितीच्या उमेदवारांना तीन लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे़
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस रंगत वाढत आहे़ प्रचारासाठी उमेदवारांना खर्च करावा लागतो़ वाढत्या महागाईमुळे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मर्यादा ही अपुरी ठरत असल्याचे पाहून यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक खर्चात एक लाखाने वाढ करण्यात आली आहे़
पूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवाराला तीन रुपये अशी मर्यादा होती़ आता ती चार लाख रुपये करण्यात आली आहे़ तसेच पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारास पूर्वी दोन लाखांपर्यंत खर्च करता येत असे़ आता तो खर्च तीन लाखांपर्यंत करता येणार आहे़

Web Title: One lac increase in election expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.