धनादेश न वटल्याप्रकरणी एक महिन्याची कैद
By Admin | Published: April 23, 2016 11:39 PM2016-04-23T23:39:38+5:302016-04-23T23:54:26+5:30
लातूर : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस अडीच लाखांचा दंड आणि एक महिन्याची कैद अशी शिक्षा लातूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली आहे.
लातूर : धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस अडीच लाखांचा दंड आणि एक महिन्याची कैद अशी शिक्षा लातूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली आहे.
लातूर शहरातील विशाल नगर येथील बालाजी पंढरी पांढे आणि लक्ष्मणसिंग ठाकूर यांच्यात मित्रत्वाच्या संबंधातून दोन लाख रुपये हात उसण्याचा व्यवहार झाला होता. कांही कारणासाठी बालाजी पांढे यांनी ही रक्कम घेतली होती. सदर रक्कम पाच ते सहा महिन्याच्या आत परत करण्याीच हमी पांढरे यांनी आपले मित्र ठाकूर यांना दिली होती. मात्र ठरल्याप्रमाणे मुदतीनंतर पांढरे यांनी हातउसणे घेतलेली रक्कम दिली नाही. रकमेऐवजी त्यांना धनादेश दिला असता, तो वटला नाही. परिणामी, आपल्याला पैसे द्यावेत अशी विनवणी मित्राकडे ठाकूर यांनी केली. शेवटी पांढरे यांनी पैसे देण्यासंदर्भात टाळाटाळ आणि उडवाडवीची दिली. शेवटी लक्ष्मणसिंग ठाकूर यांनी कायदेशीर मार्ग अवलंबून त्यांच्याविरोघात न्यायालयात खटल दाखल केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचे पुरावे, आणि वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेत आरोपी बालाजी पंढरी पांढरे यांना दोषी ठरवत २ लाख ५० हजारांचा दंड व एक महिन्याची कैद अशी शिक्षा लातूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली आहे.(प्रतिनिधी)