झाडावर कार धडकून एक जण ठार

By Admin | Published: May 20, 2014 01:30 AM2014-05-20T01:30:49+5:302014-05-20T01:35:05+5:30

औरंगाबाद : भरधाव कार रस्त्याच्या कडेला एका झाडावर आदळून शिकाऊ चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाच्या बाजूला बसलेला एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी दिल्लीगेट परिसरात घडली.

One person killed while shooting a car in the tree | झाडावर कार धडकून एक जण ठार

झाडावर कार धडकून एक जण ठार

googlenewsNext

औरंगाबाद : भरधाव कार रस्त्याच्या कडेला एका झाडावर आदळून शिकाऊ चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाच्या बाजूला बसलेला एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी दिल्लीगेट परिसरात घडली. अन्सार पटनी गफार पटनी (१९, रा. कटकटगेट, अरिश कॉलनीजवळ) असे या अपघातात ठार झालेल्या शिकाऊ कारचालकाचे नाव आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून अन्सार हा मारुती रिट्ज ही कार (क्र. एमएच-२० पीएन-४४५) शिकण्यासाठी जात होता. आज सोमवारी पहाटे ६.३० वाजेच्या सुमारास अन्सार हा त्याचा मित्र शेख अमेर शेख नसीर (१९, रा. शहाबाजार) याला सोबत घेऊन कार शिकण्यासाठी निघाला होता. सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दिल्लीगेटजवळ पोहोचले. त्यावेळी अन्सारने अचानक ब्रेकऐवजी अ‍ॅक्सीलेटर दाबले आणि कार सुसाट निघाली. कार १०० ते ११० प्रती किलोमीटर वेगाने निघाली. अचानक वेग वाढल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळली. झाडावर कार आदळल्यानंतर ती बाजूला उभ्या असलेल्या सम्राट ट्रॅव्हल्सच्या बसवर जाऊन आदळली. या अपघातात कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. अपघात झाला त्यावेळी मोठा आवाज झाला. तेव्हा रस्त्याने जाणारे वाहनधारक व आजूबाजूच्या लोकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. लोक त्यांच्या मदतीला धावले. या अपघाताची माहिती काही नागरिकांनी तात्काळ बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले व घाटी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी अन्सार यास तपासून मयत झाल्याचे घोषित केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमेर यास नंतर खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्लीगेट ते हर्सूल रस्ता रुंद करण्याची मागणी होत आहे. अन्सार हा १२ वीचा विद्यार्थी अन्सार पटनी हा मौलाना आझाद महाविद्यालयात १२ वीत शिकत होता. त्याचे वडील ट्रान्सपोर्ट चालक आहेत. त्यांनी मारुती रिट्ज कार घेतली होती. अन्सार हा मागील दोन- तीन दिवसांपासून कार शिकण्याचा प्रयत्न करीत होता. अपघातात अन्सारचा मृत्यू झाल्याची घटना समजताच त्याच्या मित्र परिवार व नातेवाईकांवर शोककळा पसरली.

Web Title: One person killed while shooting a car in the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.