बंद कंपनीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:58 PM2019-06-17T23:58:18+5:302019-06-17T23:58:58+5:30
वाळूज एमआयडीसीतील बंद कंपनीत एका ४८ वर्षीय व्यक्तीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी उघडकीस आली. एकनाथ नारायण राऊत (रा. पंढरपूर) असे मृताचे नाव आहे.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील बंद कंपनीत एका ४८ वर्षीय व्यक्तीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी उघडकीस आली. एकनाथ नारायण राऊत (रा. पंढरपूर) असे मृताचे नाव आहे.
वाळूज एमआयडीसीतील डब्ल्यू सेक्टरमधील प्लॉट नंबर ३ मध्ये बंद पडलेल्या एका कंपनीच्या शेडमध्ये एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती सोमवारी दुपारी वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. स.फौजदार आर. डी. वडगावकर यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव एकनाथ नारायण राऊत असे समजले. मृत एकनाथ राऊत हे शिवसेनेचे पश्चिम तालुका उपप्रमुख बाळासाहेब राऊत यांचे मोठे बंधू आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री ८ वाजता एकनाथ राऊत यांच्या पार्थिवावर पंढरपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोह. गणेश अंतरप हे करीत आहेत.