एक हजारावर उमेदवारांची दांडी

By Admin | Published: November 25, 2015 10:59 PM2015-11-25T22:59:08+5:302015-11-25T23:24:36+5:30

बीड : जिल्हा परिषदेच्या विविध पदभरतीसाठी बुधवारी दोन टप्प्यांत १६ केंद्रांवर परीक्षा प्रक्रिया पार पडली.

One thousand candidates of Dandi | एक हजारावर उमेदवारांची दांडी

एक हजारावर उमेदवारांची दांडी

googlenewsNext


बीड : जिल्हा परिषदेच्या विविध पदभरतीसाठी बुधवारी दोन टप्प्यांत १६ केंद्रांवर परीक्षा प्रक्रिया पार पडली. ४ हजार ८७१ पैकी ३ हजार ८४५ जणांनी परीक्षा दिली. सुमारे १ हजार २६ उमेदवारांनी मात्र पाठ फिरवली.
जि.प. च्या वतीने आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी व कृषी अधिकारी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. शहरातील १६ केंद्रांवर सकाळी १० ते ११:३० व दुपारी २ ते ३:३० या वेळेत परीक्षा झाल्या. आरोग्य सेवक महिला या ११० पदांसाठी ३ हजार ९४१ अर्ज होते. ३१६३ जणांनी उपस्थिती लावली तर ७७८ उमेदवार अनुपस्थित राहिल्या. आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के) या ४ पदांसाठी ११९ अर्ज होते. ४१ जणांनी पाठ फिरवली. केवळ ७८ जणांनी परीक्षा दिली. आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के) या ३ पदांसाठी ४८२ अर्ज आले त्यापैकी ३७३ जण परीक्षेला हजर होते, १०९ जणांची गैरहजेरी होती. औषध निर्माण अधिकारीपदाच्या एका जागेसाठी १२७ उमेदवारांनी अर्ज भरले. ८३ जण परीक्षेला होते तर ४५ जणांनी पाठ फिरवली. कृषी अधिकाऱ्याच्या एका पदासाठी २०२ उमेदवारांचे अर्ज आले होते. १४९ जणांनी हजेरी लावली तर ५३ जणांनी दांडी मारली. दरम्यान, परीक्षा प्रक्रियेदरम्यान, ठिकठिकाणच्या केंद्रांना पथकांनी भेटी दिल्या. पोलिस बंदोबस्तही तैनात होता.
सीईओ नामदेव ननावरे, अतिरिक्त सीईओ धनराज निला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, नईमोद्दीन कुरेशी, एन. ए. इनामदार आदी अधिकारी ठाण मांडून होते. (प्रतिनिधी)

Web Title: One thousand candidates of Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.