बुधवारपासून कांदा मार्केट बेमुदत बंंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:43+5:302021-06-16T04:06:43+5:30
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस मोकळा ...
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस मोकळा कांदा लिलाव असतो. जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी कांदा विक्रीसाठी आणतात. सोमवारी कांदा मार्केटमध्ये लिलावादरम्यान दोन वेळा लिलाव बंद होऊन गदारोळ झाला होता. प्रथम नवीन व्यापाऱ्याला लायसन्स दिले म्हणून कांदा व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केले होते, तर नंतर भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लिलाव थांबविला होता. नगर येथील व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून, काही त्रयस्थ लोकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप कांदा व्यापाऱ्यांनी केला आहे. यामुळे लासूर स्टेशन कांदा मार्केट बेमुदत बंद करण्याचे लेखी निवेदन कांदा व्यापारी असोसिएशनने बाजार समितीचे सभापती रवींद्र पोळ, उपसभापती दादासाहेब जगताप, सचिव कचरू रणयेवले यांना दिले आहे.