औरंगाबाद कृउबा समितीत कांदा सडू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:15 AM2018-05-25T00:15:05+5:302018-05-25T00:16:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : संपूर्ण राज्यात कांद्याचे भाव गडगडले आहेत. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती त्यास अपवाद नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संपूर्ण राज्यात कांद्याचे भाव गडगडले आहेत. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती त्यास अपवाद नाही. कांद्याची चोहोबाजूने आवक होऊ लागल्याने शिल्लक कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न अडत्यांसमोर पडला आहे. कांदा ठेवण्यासाठी जागा नसल्याने बाहेर उघड्यावरच कांद्याच्या थप्प्या लावण्यात येत आहेत. यामुळे अक्षरश: कांदा जागेवरच सडू लागला आहे.
शहरातील भाजीमंडईत कांदा १० ते १५ रुपये किलोने विक्री होत आहे. मात्र, तोच कांदा जाधववाडीतील अडत बाजारात मात्र, २०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यास कोणी धजत नाही. किमतीतील हा विरोधाभास शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. कारण, खर्चापेक्षा दुप्पट भाव सोडाच; पण गाडीभाडेही निघत नाही. अशी परिस्थिती औैरंगाबादच नाही तर संपूर्ण राज्यात निर्माण झाली आहे. यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन जास्त झाले आहे. याशिवाय पूर्वीचा कांदाही आहे. मधल्या काळात शेतक-यांनी कांदा साठवून ठेवला होता. मात्र, यंदा लवकर पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज असल्याने शेतकºयांनी कांदाचाळीतून कांदा बाहेर काढण्यास सुरुवात केली.
१० ते १५ रुपये किलोने शहरातील भाजीमंडईत कांदा विक्री होत आहे.
जाधववाडीतील अडत बाजारात मात्र कांदा २०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यास कोणी धजत नाही.
कृउबा समितीच्या अडत बाजारात गुरुवारी सुमारे १० ट्रक म्हणजे १०० टन कांद्याची आवक झाली.