नवोदय विद्यालयाची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:11 AM2017-10-30T00:11:16+5:302017-10-30T00:11:22+5:30

वसमत येथील जवाहर नवोदय निवासी विद्यालय प्रवेश परीक्षा १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० यावेळेत तालुक्याच्या प्रमुख केंद्रावरून घेण्यात येणार आहे. सदर प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून आॅनलाईन करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१७ आहे. ज्यांना आॅनलाईन अर्ज भरणे शक्य नाही त्यांचे विद्यालयात आॅफलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जातील,

Online Application Process of Navodaya Vidyalayas | नवोदय विद्यालयाची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया

नवोदय विद्यालयाची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वसमत येथील जवाहर नवोदय निवासी विद्यालय प्रवेश परीक्षा १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० यावेळेत तालुक्याच्या प्रमुख केंद्रावरून घेण्यात येणार आहे. सदर प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून आॅनलाईन करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१७ आहे. ज्यांना आॅनलाईन अर्ज भरणे शक्य नाही त्यांचे विद्यालयात आॅफलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती प्राचार्य लक्ष्मनन यांनी दिली.
आॅनलाईनद्वारे पालकांनी ६६६.ल्ल५२ँ०.ङ्म१ॅ, ६६६.्रल्ल५ँ्रल्लॅङ्म’्र.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरून प्रमाणपत्र डाऊनलोड करावीत. तसेच सत्यप्रत विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहेत तेथे देऊन अर्ज परिपूर्ण भरावा लागणार आहे. कागदपत्रावर पालक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी तसेच शिक्का आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरला आहे तेथून परीक्षा प्रवेशपत्र १५ जानेवारी २०१८ नंतर विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून घेता येईल. अधिक माहितीसाठी पालक व मुख्याध्यापकांनी संबंधित संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यालयात शिकत असावा, तसेच ३ री ते ५ पर्यंत तो सलग उत्तीर्ण असावा, विद्यार्थ्याचा जन्म ०१ मे २००५ पूर्वी किंवा ३० एप्रिल २००९ नंतरचा नसावा. जास्तीत-जास्त पाचवी वर्गात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहितीसाठी नवोदय विद्यालयाचे उपप्राचार्य बी. एस. भोसीकर, राजू जोंधळे, रवि मुटकुळे, स्वप्निल पंडित यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Online Application Process of Navodaya Vidyalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.