आॅनलाईन खतविक्रीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:42 AM2017-11-03T00:42:57+5:302017-11-03T00:43:01+5:30

जिल्ह्यात आॅनलाईन खत विक्रीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ६१७ खत विक्रेत्यांना ई-पॉस मशिन देण्यात आले असून यातील ५६७ मशिनद्वारे आरंभीचा खतसाठा नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Online fertilizer starters | आॅनलाईन खतविक्रीस प्रारंभ

आॅनलाईन खतविक्रीस प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात आॅनलाईन खत विक्रीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ६१७ खत विक्रेत्यांना ई-पॉस मशिन देण्यात आले असून यातील ५६७ मशिनद्वारे आरंभीचा खतसाठा नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर २०१७ पासून खत खरेदी आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात जिल्हयातील ६१७ खत विक्रेत्यांना पॉईट आॅफ सेल (पीओएस) मशीन देण्यात आल्या असून खत खरेदी करताना शेतकºयाच्या बोटाचा ठसा घेऊन आधारकार्ड नंबर नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकºयाने बिलाची रक्कम अदा करुन खत खरेदी करायचे आहे. त्यानंतर ही नोंद पीओएस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय सर्व्हरवर नोंद होणार आहे. त्यानुसारच खतांवर देण्यात येणारे अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्यांना देण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा दुरुपयोग टाळता येणार आहे.
जिल्हयात ६०९ ई-पॉस मशिन कार्यान्वीत झालेली असून त्यापैकी ५६७ मशिन द्वारे आरंभिचा खत साठा नोंद करण्यात आलेली आहे. नोंद करण्यात आलेल्या मशिनवर एकूण १३२६४ मे.टन खत साठा शिल्लक दर्शविण्यात आलेला आहे. एकूण ७६ टक्के मशिन द्वारे खत विक्री चालू आहे.
रासायनिक खतांवर केंद्र शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा दुरुपयोग टाळावा तसेच शेतकºयांना त्याचा योग्य लाभ व्हावा, यासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. किरकोळ खत विक्रेत्यांना तसेच कर्मचाºयांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पध्दतीने खताची विक्री करताना किंवा शेतकºयाने खत खरेदी करताना आधारकार्ड असणे आवश्यक आहे. कारण पीओएस मशिनवर संबंधीत शेतकºयांच्या बोटाचा ठसा घेऊन त्याचा आधारकार्ड नंबर नोंद करायचा आहे. त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्याला खताची विक्री होणार आहे. नंतर त्या शेतकºयाने खताच्या खरेदीची रक्कम अदा करायची आहे. हा प्रकल्प जिल्हयात यशस्वीरित्या राबविला जाईल या बाबत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Web Title: Online fertilizer starters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.