मांडूळ तस्करांचा ऑनलाईन फंडा फसला; व्हॉट्सॲपवरील छायाचित्रावरून सापडला पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 06:58 PM2021-02-12T18:58:38+5:302021-02-12T18:59:20+5:30

Crime News मांडूळ विक्रीसाठी ग्राहक शोधत छायाचित्रे काही लोकांना व्हाॅट्सॲपवर पाठविले होते.

The online fundraiser of forehead smugglers failed; Found in a police trap from a photo on WhatsApp | मांडूळ तस्करांचा ऑनलाईन फंडा फसला; व्हॉट्सॲपवरील छायाचित्रावरून सापडला पोलिसांच्या जाळ्यात

मांडूळ तस्करांचा ऑनलाईन फंडा फसला; व्हॉट्सॲपवरील छायाचित्रावरून सापडला पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

औरंगाबाद : ग्राहक शोधण्यासाठी व्हाॅट्सॲपवर मांडुळाचे छायाचित्र त्याने पाठवले. पोलिसांच्या खबऱ्याला हे छायाचित्र मिळताच त्याने मांडूळ तस्करांशी चार लाखात सौदा केला आणि मांडूळ घेऊन बोलवले. तो येताच पोलिसांनी त्याला मांडुळासह दर्श अमावस्येच्या रात्री अटक केली.

मनोहर नारायण भवरे (४७, रा. शास्त्रीनगर, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शास्त्रीनगरात वॉचमन म्हणून काम करणारा मनोहर भवरे याने साथीदाराच्या मदतीने बिडकीन येथे मांडूळ पकडले. सुमारे दोन वर्षे वयाचे हे मांडूळ आहे. या मांडुळाला मोठी किंमत मिळते असे त्याला समजले होते. यामुळे भवरे आणि त्याचा साथीदार मांडूळ विक्रीसाठी ग्राहक शोधत होता. त्याने मांडुळाची छायाचित्रे काही लोकांना पाठविले होते. याविषयीची माहिती खबऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिली. 
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी एका पोलिसाला ग्राहक म्हणून भवरेशी संपर्क साधायला लावला. भवरेने त्यांच्याही व्हॉट्सॲपवर मांडुळाचे छायाचित्र पाठविले आणि सौदा करण्यास सांगितले. भवरेने ४ लाखांत मांडूळ विक्री करण्याची तयारी दर्शविली. त्याला मांडूळ घेऊन विशालनगर येथे बोलावून घेतले. तो मांडूळ घेऊन येताच पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेले मांडूळ वनविभागाच्या ताब्यात दिल्याचे स.पो.नि. सोनवणे यांनी सांगितले.

गुप्तधन काढण्यासाठी मांत्रिकाकडून मांडुळाला मागणी
गुप्तधन काढण्यासाठी आणि जादूटोणा करणारे लोक मांडुळाचा वापर करतात. मांडूळ गुप्तधन शोधण्यासाठी महत्त्वाचे काम करते असा मांत्रिकांचा समज असतो. यामुळे मांत्रिक मांडूळ खरेदी करतात, असे म्हटले जाते.

Web Title: The online fundraiser of forehead smugglers failed; Found in a police trap from a photo on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.