वृद्धांसाठी आज ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:05 AM2021-06-16T04:05:41+5:302021-06-16T04:05:41+5:30
औरंगाबाद : वृद्धांसोबत होणारे गैरवर्तन मार्गदर्शन आणि उपाय या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वार्धक्यशास्त्र विभाग, आयएमएच्या वतीने ...
औरंगाबाद : वृद्धांसोबत होणारे गैरवर्तन मार्गदर्शन आणि उपाय या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वार्धक्यशास्त्र विभाग, आयएमएच्या वतीने केले आहे. मंगळवारी दुपारी ४.०५ ते ५ दरम्यान हा कार्यक्रम होणार असून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहे. https://www.youtube.com/channel/UCyO8Mld-08qXPJGurwenZwA या युट्युब लिंकवर सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. वृद्धांसोबत होणारे गैरवर्तन म्हणजे काय? याविषयी प्राध्यापक डाॅ. मंगला बोरकर, वृद्धांसाठी केअर होम काळाची गरज याबद्दल डाॅ. नरेंद्र वैद्य, तर वृद्धांसोबतचे गैरवर्तन कसे रोखायचे, याविषयी आरोग्यविज्ञान विद्यापिठाचे कुलसचिव डाॅ. कालिदास चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. मंगला बोरकर, डाॅ. संतोष रंजलकर, डाॅ. शैलजा राव यांनी केले आहे.