बीजेएस मिशन राहत ऑक्सिजन बँकेचे ऑनलाइन उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:04 AM2021-05-31T04:04:01+5:302021-05-31T04:04:01+5:30
या अंतर्गत ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे उद्घाटन करण्यात आले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व कार्याध्यक्ष सुभाष झांबड ...
या अंतर्गत ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व कार्याध्यक्ष सुभाष झांबड यांच्या उपस्थितीत ऑनलाइन उद्घाटन झाले. खोकडपुरा येथील वर्धमान पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारतीय जैन संघटनेचे मार्गदर्शक ॲड. गौतम संचेती, वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी उपस्थित होते.
मिशन झिरोसोबत मिशन राहत सुरू करून रुग्णांना खऱ्या अर्थाने राहत देण्याचे कार्य बीजेएस व वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था करत असल्याबद्दल संघटनेच्या कार्याचे राजेंद्र दर्डा यांनी कौतुक केले.
लंडन येथील मयूर संचेती व दक्षिण आफ्रिकेमधील मित्रांनी बीजेएसला ऑक्सिजन मशीन भेट दिल्याबद्दल त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांनी कोविड काळातील सेवा प्रकल्पाची माहिती दिली. ऑक्सिजन मशीनसंदर्भात
जिल्हा सचिव व प्रकल्पप्रमुख अनिलकुमार संचेती व प्रकल्पप्रमुख
प्रकाश कोचेटा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठवाडा विभागीय अध्यक्ष पारस चोरडिया, अतुल गुगले आदीं यावेळी उपस्थित होते.
कॅप्शन
भारतीय जैन संघटना आणि वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मिशन राहत ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली. यावेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन. समवेत ॲड. गौतम संचेती, डॉ. शांतीलाल शिंगी आदी.