पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन डीएमआयसीचे ऑनलाइन लोकार्पण

By बापू सोळुंके | Published: September 29, 2024 08:18 PM2024-09-29T20:18:44+5:302024-09-29T20:19:33+5:30

ऑरिकच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात १ लाख १० हजार रोजगार उपलब्ध होणार

Online launch of bidkin DMIC by Prime Minister Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन डीएमआयसीचे ऑनलाइन लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन डीएमआयसीचे ऑनलाइन लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटीअंतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे रविवारी (दि.२९) लोकार्पण करण्यात आले. या औद्योगिक पट्ट्यात प्रत्यक्ष ३५ हजार, तर अप्रत्यक्ष ७५ हजार असे १ लाख १० हजार रोजगार उपलब्ध होतील, असे पंतप्रधानांनी याप्रसंगी नमूद केले.

राजभवनातून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, पुणे येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तर शेंद्रा येथील ऑरिक हॉल येथे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, डीएमआयसीचे सहव्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, शैलेश धाबेकर आणि महेश पाटील, मसिआचे अध्यक्ष चेतन राऊत, माजी अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे, माजी अध्यक्ष दुष्यंत पाटील यांच्यासह विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ८ हजार एकरावर या औद्योगिक वसाहतीचा विस्तार आहे. या औद्योगिक वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक विविध उद्योगांनी केली आहे.

बिडकीन औद्योगिक पट्ट्यात ८ हजार एकर जमीन
बिडकिन डीएमआयसी ७ हजार ८५५ एकर जमिनीवर वसवलेली आहे. बिडकीनपासून ३५ किमीवर चिकलठणा विमानतळ आहे. तर जेएनपीटी बंदर ३२० किमीवर आहे. जालना ड्रायपोर्ट ६५ किमी अंतरावर आहे. मोठ्या बंदरासाठी सुलभ दळणवळण होण्यासाठी ३५ समृद्धी महामार्ग ऑरिक सिटीच्या शेंद्रा पट्ट्यापासून आणि बिडकीनपासून ३५ किलोमीटरवर आहे. या वसाहतीत प्लग आणि प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, रात्रंदिवस वीज आणि पाणीपुरवठा, पर्यावरण परवानगी, योग्य क्षमतेचे सीईटीपी आणि एसटीपी प्रकल्प, अद्ययावत इंटरनेट सुविधा आणि या वसाहतीलगतच नागरी वसाहती उभारल्या जाणार आहेत.

बिडकीनमध्ये आजपर्यंत आलेले प्रकल्प

इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक ॲथर एनर्जी, औषधनिर्माण क्षेत्रातील पिरॅमल फार्मास्युटिकल, विशेष पॅकेजिंग क्षेत्रातील कॉस्मो फिल्म आणि ऑटोमोबाइल, औद्योगिक वंगणची निर्मिती करणारी लुब्रिझॉल या कंपन्यांचा समावेश आहे. टोयटो किर्लोस्कर कंपनी येथे ईव्ही मोटार आणि हायब्रीड वाहननिर्मिती करणार आहे. जेएसडब्ल्यू मोबिलिटी या कंपनीचाही बिडकीनमध्ये ६०० हेक्टवर प्रकल्प येत आहे.

Web Title: Online launch of bidkin DMIC by Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.