ऑनलाइनमुळे काम सुकर : निवडणुका, शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेच्या वेळी वाढतात जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:02 AM2021-02-11T04:02:51+5:302021-02-11T04:02:51+5:30
औरंगाबाद : ऑनलाइनमुळे काम सुकर झाले आहे. मनुष्यबळाची कमतरता जाणवत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुकांच्या व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेच्या ...
औरंगाबाद : ऑनलाइनमुळे काम सुकर झाले आहे. मनुष्यबळाची कमतरता जाणवत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुकांच्या व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेच्या काळात जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे वाढतात. औरंगाबाद जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात महत्त्वाच्या पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. एकही पद रिक्त नाही. त्यामुळे कामे रखडली, असे मुळीच नाही, असे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी वेळेवर गर्दी न करता विहित वेळेत तीन महिने आधी अर्ज करणे गरजेचे असते. आता औरंगाबाद मनपाच्या निवडणुका जेव्हा होतील, तेव्हा इच्छुक उमेदवारांनी हा नियम लक्षात घ्यावा असे आवाहन या कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
-औरंगाबाद जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे साधारणतः प्रत्येक महिन्यात सहाशे ते एक हजार प्रकरणे प्राप्त होतात.
-तथापि, शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी प्राप्त होणाऱ्या प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
-२१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ४ हजार २९८ प्रकरणे प्राप्त झाली. (जोड आहे)