लोकमतच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ऑनलाइन रांगोळी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 04:16 PM2022-01-08T16:16:32+5:302022-01-08T16:17:16+5:30
ऑनलाइन रांगोळी स्पर्धेमधील प्रथम पाच विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि पाच विजेत्यांना उत्तेजनार्थ भेटवस्तू पारितोषिक रुपात मिळणार आहेत.
औरंगाबाद : लोकमत मराठवाडा आवृत्तीचा ४० वा वर्धापनदिन ९ जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सखी मंचतर्फे ऑनलाइन रांगाेळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑनलाइन रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९ जानेवारीस अंगणात रांगोळी काढून रांगोळीच्या शेजारी अथवा रांगोळीमध्ये ४० व्या लोकमत वर्धापनदिनाचा लोगो वापरून रांगोळीसोबत सेल्फी किंवा फोटो नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांकासह ८०८०५१६७३७ या व्हॉटस्ॲपवर क्रमांकावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९७६६९२८६८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विजेत्यांना मिळणार आकर्षक भेटवस्तू
ऑनलाइन रांगोळी स्पर्धेमधील प्रथम पाच विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि पाच विजेत्यांना उत्तेजनार्थ भेटवस्तू पारितोषिक रुपात मिळणार आहेत. जास्तीत जास्त वाचकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.