शेतीमालाची आॅनलाईन नोंदणी करावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:31 AM2017-10-29T00:31:34+5:302017-10-29T00:31:42+5:30

लोहा शहरातील बाजार समितीच्या वतीने सोयाबीन केंद्राची उभारणी करण्यात आली.शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा, शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी बांधवानी शेतीमालाची आॅनलाईन नोंदणी खरेदी विक्री संघ येथे करावी, असे अवाहन कृऊबाचे संचालक किरण सावकार वट्टमवार यांनी केले.

Online registration of farming should be done ' | शेतीमालाची आॅनलाईन नोंदणी करावी’

शेतीमालाची आॅनलाईन नोंदणी करावी’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा : लोहा शहरातील बाजार समितीच्या वतीने सोयाबीन केंद्राची उभारणी करण्यात आली.शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा, शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी बांधवानी शेतीमालाची आॅनलाईन नोंदणी खरेदी विक्री संघ येथे करावी, असे अवाहन कृऊबाचे संचालक किरण सावकार वट्टमवार यांनी केले.
सोयाबीन खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी वट्टमवार बोलत होते. यावेळी कृउबाचे संचालक केशवराव मुकदम, अंकुशराव कदम, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार, सचिव आनंद घोरबाड उपस्थित होते. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवानी आपला शेतीमाल चांगल्या दर्जाचा हा शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने विक्री करू नये, हा शेतीमाल विक्रीसाठी शेतकºयांनी मूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाची सन २०१७-१८ खरीप हंगामातील शेतीमाल खरेदी प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शेतकरी बांधवानी आॅनलाईन खरेदी प्रक्रिया तालुका खरेदीसंघ येथे आॅनलाईन नोंदणी करावी.
नोंदणी करते वेळी शेतकºयांनी लागवडी नुसार पीक पेराक्षेत्र सोयाबीन दोन एकर, मुग तीन एकर, उडीद दोन एकर, तुर एक एकर, ज्वारी, बाजरी, मका दोन एकर नोंदीचा सातबाराउतारा मुळप्रत, आधार कार्ड, बँक खातेपासबुक प्रत, मोबाईल क्रमांक यासह सर्व बाबी खरीप हंगामातील २०१७-१८ या वर्षातील पिकांची नोंदणी करणे आवश्यक आसून नाफेडची खरेदी सुरू होताच मुग, उडीद, सोयाबीन, खरेदी करण्यात येणार आहे. तसेच खरीप हंगाम २०१७-१८ मधील कापूस खरेदी आॅनलाईन प्रक्रियेनुसार बाजारसमितीत शेतकºयांची नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी, व्यापारी, हमाल व मापडी बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Online registration of farming should be done '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.