जायकवाडी धरणात केवळ २६ टक्के पाणी, दमदार पावसाची प्रतीक्षा

By बापू सोळुंके | Published: July 10, 2023 12:28 PM2023-07-10T12:28:40+5:302023-07-10T12:33:07+5:30

शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली असल्याने मराठवाड्यातील जनता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. त्यात जायकवाडीच्या उर्ध्व भागात पाऊस न पडल्याने चिंता

Only 26 percent water in Jayakwadi dam, waiting for heavy rains | जायकवाडी धरणात केवळ २६ टक्के पाणी, दमदार पावसाची प्रतीक्षा

जायकवाडी धरणात केवळ २६ टक्के पाणी, दमदार पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यातही जायकवाडीच्या उर्ध्व भागात जोरदार पाऊस न पडल्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक थांबलेली आहे. दुसरीकडे मात्र पाण्याचा वापर सुरूच असल्याने ९ जुलै रोजी जायकवाडी धरणात केवळ २६.८६ टक्केच जलसाठा उरला आहे.

शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली असल्याने मराठवाड्यातील जनता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत जून महिना गेला. आता जुलैचे ९ दिवस उलटले तरी गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडलेला नाही. पावसाने दांडी मारल्याने मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. दमदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आकाशात ढग दाटून येत आहेत. मात्र, मुसळधार पाऊस पडत नाही. परिणामी, मराठवाड्यातील नदी, नाले अजूनही कोरडे पडलेले आहेत. पैठण येथील जायकवाडी धरणाचा साठा दिवसेंदिवस घटत आहे. ९ जुलै रोजी जायकवाडी धरणात २६.८६ टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून प्राप्त झाली. याशिवाय अन्य मोठी, मध्यम आणि लघु धरणे तळ गाठत आहेत. जायकवाडीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच विविध शहरांची तहान भागविली जाते.

जायकवाडी धरणाची आजची स्थिती
धरणाची पाणी साठवण क्षमता- २१७१ द.ल.घ.मी.
आजचा जिवंत जलसाठा- ५८३.१३८ द.ल.घ.मी.
आजच्या साठ्याची टक्केवारी- २६.८६ टक्के
गतवर्षी आजच्या दिवशी असलेला जलसाठा- ७४७ द.ल.घ.मी.
गतवर्षीची टक्केवारी - ३४.४५ टक्के
जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीक्षेत्र- ७ लाख ७५ हजार हेक्टर.
आजपर्यंत झालेली पेरणी- ३ लाख १६ हजार हेक्टर
जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित पाऊस १६९ मि.मी.
प्रत्यक्षात झालेला पाऊस -१३६ मि.मी.
गतवर्षी आजच्या तारखेस झालेला पाऊस-२०१ मि.मी.

Web Title: Only 26 percent water in Jayakwadi dam, waiting for heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.