अवघे २६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

By Admin | Published: May 31, 2016 11:23 PM2016-05-31T23:23:52+5:302016-05-31T23:28:34+5:30

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

Only 26 thousand quintals of seed are available | अवघे २६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

अवघे २६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुमारे ४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी बी-बियाणे तसेच खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पेरा होणाऱ्या सोयाबीन, तूर, उडीद आणि खरीप ज्वारीचे मिळून ८३ हजार ६६ क्विंटल बिण्याची मागणी नोंदविण्यात आली असता आजघडील केवळ २५ हजार ५२५ क्विंटल एवढेच बियाणे उपलब्ध झाले आहे.
गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला होता. परंतु, पावसाने दगा दिल्यामुळे साधा उत्पादन खर्चही निघाला नाही. यंदाही शेतकरी सोयाबीनवर भर देतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार हेक्टर एवढे असले तरी प्रत्यक्ष १ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी होईल, असे कृषी विभाभागाचे म्हणणे आहे. यासाठी महाबीज तसेच राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडून सुमारे ७२ हजार ८०० क्विंटल बियाणाची मागणी करण्यात आली आहे. आजवर केवळ २३ हजार १८४ क्विंटल म्हणजेच पन्नास टक्केही बियाणे उपलब्ध झालेले नाही.
अशीच अवस्था तुरीच्या बियाण्याबाबत आहे. ८४ हजार ४०० हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ९८ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरणी होईल. तसे कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. ४ हजार ११६ क्ंिवटल बियाणे मंजूर असतना सद्यस्थितीत अवघे ५०४ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.
भूम, वाशीसह आदी तालुक्यांतील शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या उडीद पेरणीवर भर देताता. सर्वसाधारण क्षेत्र ४३ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. प्रत्यक्षात ५० हजार हेक्टवर पेरणी होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार ३ हजार ९०० क्विंटल बियाणे पुरविण्यास शासनाने मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात १ हजार ४०७ क्विंटल बियाणेच उपलब्ध झाले आहे. खरीप ज्वारी पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार हेक्टर एवढे आहे. प्रत्यक्षात ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आली आहे. यासाठी २ हजार २५० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली असता प्रत्यक्षात अवघे ४३० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Only 26 thousand quintals of seed are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.