छत्रपती संभाजीनगरच्या १७ लाख लोकसंख्येसाठी अवघे ३,८०० पोलीस अधिकारी- कर्मचारी

By सुमित डोळे | Published: September 16, 2023 01:00 PM2023-09-16T13:00:39+5:302023-09-16T13:01:15+5:30

अनुशेष कधी भरणार? ५५५ नागरिकांच्या मागे केवळ एक पोलिस, मग शहर सुरक्षित राहील कसे?

Only 3,800 police officers-staff for Chhatrapati Sambhajinagar's population of 1.7 lakhs | छत्रपती संभाजीनगरच्या १७ लाख लोकसंख्येसाठी अवघे ३,८०० पोलीस अधिकारी- कर्मचारी

छत्रपती संभाजीनगरच्या १७ लाख लोकसंख्येसाठी अवघे ३,८०० पोलीस अधिकारी- कर्मचारी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात गेली. दोन मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या मधोमध वसलेल्या शहराच्या प्रत्येकी ५५५ नागरिकांच्या मागे मात्र एकच पोलिस आहे. यंदा आठ महिन्यांमध्ये गुन्ह्यांची संख्या पाच हजार ६३२ झालेली असताना शहराच्या सुरक्षेची असलेल्या शहर पोलिस विभाग मात्र अद्यापही केवळ ३,८०० कर्मचारी, अधिकाऱ्यांचा आहे. यामुळे कायदा, सुव्यवस्था राखण्यात पोलिस विभाग अपुरा पडत आहे. त्यामुळे गृह विभाग यंदा तरी हा पोलिस विभागाचा अनुशेष भरून काढणार का, याकडे पोलिस आस लावून आहेत.

शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदारीसह प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस विभागाची आहे. १९९१ मध्ये अधीक्षक ते पोलिस आयुक्तालयात रूपांतर झाल्यानंतर शहरात आजपावेतो एकूण १८ पोलिस ठाणी बनली. तीन वर्षांपासून शहर पोलिस दलाच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे प्रलंबित असताना कर्मचारी वाढीचा प्रस्तावदेखील अद्याप मंजूर झालेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुंडलिकनगर व वेदांतनगर पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली. मात्र, त्यासाठीचा आवश्यक वाढीव अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मात्र अद्यापही प्रलंबित राहिला. परिणामी, आहे त्या संख्येतच पोलिस विभागाला कामकाज करावे लागत आहे.
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १०,१०० चौ. किलोमीटर त्यापैकी १४१.१० चौ.कि.मी. हे शहरी क्षेत्र आणि ९,९५८.९० चौ. कि.मी. हे ग्रामीण क्षेत्र आहे.

असा आहे सध्याचा पोलिस विभाग
- १९ ऑक्टोबर, १९९१ मध्ये पोलिस आयुक्तालयाची स्थापना.
- एकूण १८ पोलिस ठाणी.
- १९९३ मध्ये सर्वाधिक ९५० पोलिसांची भरती. त्यानंतर मेगा भरतीच नाही.
- एक पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, पाच सहायक आयुक्तांसह २९ पोलिस निरीक्षक.
- सध्या तीन हजार ८०० पोलिस. त्यापैकी तीन हजार ३०० च्या आसपासच सक्रिय.
- वाहतूक विभागात केवळ ३५० कर्मचारी.

२०२३ (सप्टेंबर) पोलिस ठाणेनिहाय गुन्ह्यांची संख्या
मुकुंदवाडी - ३९५, एमआयडीसी सिडको - ४५०, सिडको - ६१५, हर्सूल - १९९, जिन्सी - २७१, जवाहरनगर - २२५, सातारा - २८४, उस्मानपुरा - १७२, सिटी चौक - ३२७, बेगमपुरा - २०५, क्रांती चौक - २९५, वेदांतनगर - १८२, छावणी - ४३८, वाळूज - २९३, पुंडलिकनगर - ३४१, एमआयडीसी वाळूज - ७७३, दौलताबाद - १५७, सायबर पोलिस ठाणे - १०= एकूण - पाच हजार ६३२
२०२३ मध्ये - १४ हजार ३२६ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद
२०२२ मध्ये एकूण ७ हजार १७४ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद

हे प्रस्ताव अद्यापही कागदावरच
- क्रांती चौक पोलिस ठाणे व कर्मचारी निवासस्थाने.
- जिल्हा पोलिसांचे अत्यंत दयनीय अवस्थेतले कर्मचारी निवासस्थान.
- हद्दवाढ करून बिडकीन, शेंद्रा औद्योगिक वसाहतीचा आयुक्तालयात समावेश.
- सातारा, एमआयडीसी वाळूज हद्दीमध्ये बदल.
- दोन उपायुक्तांची पदे मंजूर, परंतु अद्यापही अधिकारी नियुक्त नाही.

अवस्था बिकट, काम करणेही अवघड
- शहर पोलिस दलाकडे असलेल्या ३,८०० कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.
- यापैकी मुख्यालय, नियंत्रण कक्ष व अन्य दैनंदिन प्रशासकीय कामांमध्ये जवळपास ६०० कर्मचारी.
- एका कुटुंबात किमान तीन वाहने, परंतु वाहतूक कर्मचारी मात्र अवघे ३५०.

Web Title: Only 3,800 police officers-staff for Chhatrapati Sambhajinagar's population of 1.7 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.