ज्ञानेश्वरांनंतरच आध्यात्मिक लोकशाहीचा उदय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 09:43 PM2018-11-15T21:43:32+5:302018-11-15T21:43:45+5:30
औरंगाबाद : समाजाने ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाकारले. हरतºहेने त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण याकडे साफ दुर्लक्ष करून ज्ञानदेवांनी त्याच समाजाच्या सुखसमृद्धीसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. महाराष्ट्रात अनेक संत उदयाला आले; पण आध्यात्मिक लोकशाहीचा उदय ज्ञानेश्वरांनंतरच झाला, अशा शब्दांत पार्थ बावस्कर यांनी ‘पसायदान’ या विषयावर निरुपण केले.

एन-२ परिसरातील ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे दीपावलीनिमित्त १० नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पार्थ बावस्कर यांनी ‘पसायदान’ या विषयावर अभ्यासपूर्ण निरुपण करून ज्येष्ठांची मने जिंकून घेतली. शाम जावळीकर, आर. पी. दुसे, सरिता देशमुख आदींची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.
बावस्कर म्हणाले की, समाजाने नाकारल्यानंतरही आध्यात्मिक प्रगती सुरू ठेवून सर्वांना माफ करण्याचा आदर्श ज्ञानेश्वरांनी त्यांच्या जीवनातून घालून दिला. ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आणि पसायदानातील प्रत्येक ओळीवर भाष्य करून त्यांनी ज्येष्ठांना खिळवून ठेवले.