सखी मंच सदस्य नोंदणीला अवघे काही दिवस शिल्लक

By Admin | Published: March 19, 2016 12:13 AM2016-03-19T00:13:40+5:302016-03-19T00:58:13+5:30

बीड : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत 'डान्स व गाण्या'चा आनंद लुटण्याची संधी आहे.

Only a few days left for Sakhi forum member registration | सखी मंच सदस्य नोंदणीला अवघे काही दिवस शिल्लक

सखी मंच सदस्य नोंदणीला अवघे काही दिवस शिल्लक

googlenewsNext


बीड : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत 'डान्स व गाण्या'चा आनंद लुटण्याची संधी आहे. एक्सपर्ट प्रस्तुत ‘सखी जल्लोष २0१६’ मध्ये जुन्या व नवीन गाण्याचे धमाल सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम फक्त सखी मंचच्या सदस्यांसाठीच असून, सौभाग्य लॉन, अंबिका चौक, बीड येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सदस्यता नोंदणी सुरूच राहील.
सखींवर बक्षिसांचा वर्षभर वर्षाव होणार आहे. म्हणून त्वरित सखी मंचच्या सदस्या होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाला सखी मंच-२0१६ चे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. सदस्यता नोंदणी पुढील ठिकाणी स. ११ ते सायं. ५ या वेळेत सुरू आहे. नावनोंदणीसाठी जन्मतारखेचा पुरावा आवश्यक नाही. १. लोकमत कार्यालय - स्टेडियम कॉम्प्लेक्स, सहयोगनगर, बीड २. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
अधिक माहितीसाठी ७२७६७६३०६७ या क्रमांकावर संपर्क साधावा. नावनोंदणी करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. सदस्य झाल्यावर प्रत्येक सखीला रु. ५0५0 च्या भेटवस्तू मोफत मिळणार आहेत. यामध्ये कॅसरोल सेट, फिटनेस बुक, आकर्षक टेबल कॅलेंडर मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Only a few days left for Sakhi forum member registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.