केवळ पाचच फवारणी यंत्रांवर जिल्ह्याची मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:12 AM2017-07-21T00:12:48+5:302017-07-21T00:19:53+5:30
हिंगोली : जिल्ह्यात अधून-मधून हजेरी लावत असलेल्या पावसामुळे जागो- जागी साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात अधून-मधून हजेरी लावत असलेल्या पावसामुळे जागो- जागी साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र अजूनही एकाही ग्रामपंचायतीची धूर फवारणीसाठी मागणी आली नसल्याचे जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे सांगितले जात आहे. केवळ पाचच धूर फवारणी यंत्र जिल्ह्यासाठी उपलब्ध आहेत.
पावसाच्या हजेरीने डासांची उत्पत्तीस्थाने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र अजून तरी कोणत्याच ग्रा. पं.ने हिवताप कार्यालयाकडे धूर फवारणीची मागणी केलेली नाही. तर हिवताप विभागातर्फे दक्षता म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ६ जुलै रोजी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या.
डासांपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शनही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र धूर फवारणी यंत्र सज्ज असले तरी मागणीच नसल्याने हिवताप कार्यालय मागणीच्या प्रतीक्षेत आहेत.