औरंगाबादेत शस्त्रक्रियातज्ज्ञांच्या परिषदेत जगातील एकमेव सर्जिकल रोबोचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 02:11 PM2019-01-31T14:11:32+5:302019-01-31T14:36:22+5:30
जगातील एकमेव सर्जिकल रोबो परिषदेत सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात मेसिकॉन संयोजन समिती, औरंगाबाद सर्जिकल सोसायटी आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ४१ व्या वार्षिक मेसिकॉन परिषदेला आज, ३१ जानेवारी रोजी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सुरुवात झाली.
जगातील एकमेव सर्जिकल रोबो परिषदेत सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या रोबोविषयी माहिती देत आहेत एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ.प्रवीण सूर्यवंशी. यावेळी एएसआयचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुमार, भावी अध्यक्ष डॉ.रघुराम, डॉ. रॉय पाटणकर, 'एमजीएम'चे अंकुशराव कदम, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, संयोजन अध्यक्ष डॉ. मिलिंद देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर मुसांडे, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख, डॉ. नारायण सानप, डॉ. पुरुषोत्तम दरख आदी उपस्थित होते.
३१ जानेवारीला शस्त्रक्रियासंदर्भात मूलभूत बाबींवर चर्चा, प्रात्यक्षिक होईल. १ फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक होणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत होतील मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या हस्ते शस्त्रक्रियांच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेचे उद्घाटन होईल. मुख्य परिषदेचे उद्घाटन एमजीएम आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे
कुलगुरु कमलकिशोर कदम यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता होईल.
पहा व्हिडिओ :