केवळ संघच सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:17 AM2017-08-14T05:17:33+5:302017-08-14T05:17:36+5:30
देशभरात सध्या असुरक्षितेचे वातावरण आहे. अल्पसंख्यांक, महिला, शेतकरी, कामगार, युवक, मीडिया सगळेच त्रस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशभरात सध्या असुरक्षितेचे वातावरण आहे. अल्पसंख्यांक, महिला, शेतकरी, कामगार, युवक, मीडिया सगळेच त्रस्त आहेत. भाजपा सरकारमुळे देशात फक्त राष्टÑीय स्वयंसेवक संघच सुरक्षित आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ आझाद यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, खा. रजनी पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक उपस्थित होते.
इंदिराजींच्या आठवणींना उजाळा देत, निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता लढण्यासाठी सज्ज राहाण्याचे आवाहन आझाद यांनी काँग्रेसजनांना केले.
गांधीजींची टोपी ही स्वातंत्र्याची निशाणी आहे. आरएसएसची टोपी काळी आहे. सध्या देशावर काळ्या इंग्रजांचे राज्य चालू आहे. ते लुटण्यासाठीच आले आहेत, अशी टीका महाराष्टÑाचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली. या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांचेही भाषण झाले.
>भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, ‘नुकताच ९ आॅगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी इंग्रजांना ‘चले जाव’ म्हणावे लागले होते. आता भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. आज इंदिराजींना बदनाम करण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातूनसुद्धा होत आहे, पण तो पाहायला कुत्रंही गेलं नाही.
महाराष्टÑात जाहीर केलेली शेतकºयांची कर्जमाफी कागदावरच असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. कर्जमाफी मिळाली का, असे त्यांनी विचारले असता, कुणीही हात वर केला नाही. सरकार फक्त जाहिराती देऊन भूलभुलैया करीत आहे, असे ते म्हणाले.
ज्यांची डोकी स्वच्छ नाहीत, ज्यांचे विचार स्वच्छ नाहीत, ते भारत स्वच्छ करू शकत नाहीत. आपल्याकडे इंदिरा गांधींचा वैचारिक वारसा आहे. तो वारसा जपत, आपण खरेदी-विक्री संघ झालेल्या भाजपाला हुसकावून लावले पाहिजे. गुजरातमध्ये अहमद पटेल यांच्या विजयाने तशी सुरुवात झाल्याचे चव्हाण म्हणाले.
शरद पवार ‘संपुआ’बरोबरच
दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला राष्टÑवादीचे नेते शरद पवार अनुपस्थित होते, याकडे लक्ष वेधता, मी पवारांना त्या दिवशी फोनद्वारे संपर्क साधला होता, परंतु त्यांनी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत; पण ते यूपीएबरोबरच आहेत, असर आझाद यांनी सांगितले.
>आश्वासनांचा विसर
केंद्र सरकारचा कारभार टेलिव्हिजनच्या माध्यमातून सुरू आहे. मोदींना निवडणूक काळातील आश्वासनांचा विसर पडला आहे. देशभर गोरक्षकांचा धुमाकूळ सुरू आहे. नोटाबंदीमुळे कंबरडे मोडलेले असताना, जीएसटी आल्याने सर्वसामान्यांवर बोजा पडला, असेही आझाद म्हणाले.