विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:03 PM2024-10-26T14:03:05+5:302024-10-26T14:04:28+5:30

उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

Only two days left to file Assembly nominations; Application filed by rebels | विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल

विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात महायुतीमध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. २६ व २७ ऑक्टोबर सुटी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २८ व २९ ऑक्टोबर हे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. पैठण, फुलंब्री, कन्नडमध्ये बंडखोरांचे अर्ज दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ३७ जणांनी ६६ अर्ज खरेदी केले, तर २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले, २६ व २७ रोजी उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया बंद असेल.

२८ जणांचे अर्ज दाखल : चौथ्या दिवशी नेले ६६ अर्ज
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करून घेण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत सुरू झाली. पहिल्याच दिवशी २६८ जणांनी ५८७ अर्ज घेतले होते. दुसऱ्या दिवशी, बुधवारी १७५ जणांनी ३८५ उमेदवारी अर्ज खरेदी केले. गुरुवार २४ रोजी १४९ अर्ज नेले, तर २४ जणांनी दाखल केले. शुक्रवारी ३७ जणांनी ६६ अर्ज खरेदी केले, तर २८ उमेदवारी अर्ज दाखल केले.

चौथ्या दिवशी आलेले अर्ज...
सिल्लोड : संगपाल सोनवणे (बसपा), श्रीराम आळणे (अपक्ष)
कन्नड : मनोज पवार (अपक्ष), अ. जावेद अ. वाहेद (अपक्ष), सईद अहेमद खाँ (अपक्ष)
फुलंब्री : मंगेश साबळे (अपक्ष), रमेश पवार (अपक्ष), रमेश काटकर (अपक्ष)
औरंगाबाद मध्य : बबनगीर गोसावी (हि.ज.पा.)
औरंगाबाद पश्चिम : संजय शिरसाट (शिंदेसेना), मनीषा खरात (अपक्ष)
औरंगाबाद पूर्व : अतुल सावे (भाजपा), शेख गफरान (अपक्ष), जयप्रकाश घोरपडे (भा.शे.का.प), साहेबखान पठाण (बीआरएसपी), मो.इसा.मो.यासीन (एमआयएमएआयएएम)
पैठण : अनिल राऊत (अपक्ष), गाेरखनाथ राठोड (अपक्ष), अजारोद्दी कादरी (आ.स्वा.से), वामन साठे (बसपा), जियाउल्ताह अकबर शेख (अपक्ष), विजय चव्हाण (अपक्ष).

Web Title: Only two days left to file Assembly nominations; Application filed by rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.