‘पर्यायी रस्ता वाहतुकीस खुला करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:02 AM2017-09-07T01:02:59+5:302017-09-07T01:02:59+5:30
बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल तात्काळ दुरूस्त करून दोन दिवसांत वाहतूक खुली करा, अशा सूचना आयआरबी कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल तात्काळ दुरूस्त करून दोन दिवसांत वाहतूक खुली करा, अशा सूचना आयआरबी कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिल्या. बुधवारी मुंडे यांनी पुलाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
बीड शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर बिंदुसरा नदीवरील निजामकालीन पूल नादुरूस्त झाल्यामुळे नदीपात्रातून पर्यायी वळण रस्ता बांधण्यात आला होता. यावर्षी पहिल्याच पावसामध्ये सदरील वळणरस्ता वाहून गेल्याने शहरातील नागरीकांना वाहतूकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात येणाºया वाहनधारकांना वाहतुक कोंडी मुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने बिंदुसरा नदीवरील पूल प्रश्नी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट देत पुलाची पाहणी केली. संंबंधित आयआरबी कंपनीच्या अधिकाºयांना व जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांना जाब विचारत दोन दिवसात पर्यायी रस्ता वाहतूकीसाठी खुला करा, अशा सूचना करत पर्यायी पूल का होत नाही, असा सवाल उपस्थित केल्यानंतर आयआरबी कंपनीकडून सिमेंटचे पाईप उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी तातडीने पर्यायी पुलाच्या कामासाठी सिमेंटचे पाईप उपलब्ध करून दिले. येत्या आठ दिवसात पर्यायी रस्ता सुरू होणार असल्याने शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणारा नाहक त्रास आता थांबेल, अशी आशा आहे.
वाहून गेलेल्या पर्यायी पुलाची तातडीने उभारणी करून बीडच्या नागरिकांची गैरसोय दूर करावी, यासाठी त्यांनी आयआरबी आणि महामार्गाच्या अधिकाºयांशी बैठक घेतल्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचीही भेट घेतली. मिनी बायपास तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आ.राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, रा.कॉ. तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, बबन गवते, शिवाजी जाधव यांच्यासह रा.कॉ. पदाधिकारी उपस्थित होते.