मकबऱ्यासमोर उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:02 AM2021-09-24T04:02:07+5:302021-09-24T04:02:07+5:30

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण : मकबरा काळातील बांधकामाची शक्यता -- औरंगाबाद : बिबी का मकबऱ्यासमोरील उंचवट्याचे उत्खनन करून मलबा हटविण्यात ...

Open the base of the bathroom, toilet in the excavation in front of the tomb | मकबऱ्यासमोर उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा

मकबऱ्यासमोर उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा

googlenewsNext

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण : मकबरा काळातील बांधकामाची शक्यता

--

औरंगाबाद : बिबी का मकबऱ्यासमोरील उंचवट्याचे उत्खनन करून मलबा हटविण्यात येत आहे. त्यात मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया, अवशेष आढळले आहे. या मलब्याखाली खाली आणखी काय दडलंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद सर्कल कार्यालयाकडून मकबरासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर ४० मीटर बाय ४० मीटर परिसरात स्ट्रेन्चची आखणी १४ सप्टेंबरला करून उत्खननाचा शुभारंभ करण्यात आला. दररोज चार ते दहा जण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करत आहेत. समोरच्या भागात दोन स्ट्रेन्चमध्ये चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून मलबा हटवला गेल्याने विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले आहेत. पावसामुळे कधी खोदकाम होते कधी थांबत आहे. या सापडलेल्या बांधकामांना लागून पुढे काय अवशेष सापडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिबी का मकबऱ्यासमोरच्या परिसरात नवी संरक्षण भिंत, पार्किंगचा परिसर विकसित करण्यासोबत इतर विकासकामे करण्याच्या अंदाजपत्रकाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने मंजुरी दिली. त्याअंतर्गत हे काम करण्यात येत आहे. २००५ ते २००९ दरम्यान असलेल्या अधीक्षकांनी मकबऱ्यासमोरच्या जागेत काही पुरातत्व अवशेष असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, या परिसरातील अतिक्रमणासह इतर कारणांनी ते काम रेंगाळले होते. नुकतेच मनपाने येथील अतिक्रमण हटवले.

--

संरक्षक भिंतीसाठी मलबा हटवण्याचे काम

--

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने पर्यटकांना सोयी सुविधांसाठी मकबरा परिसरात सुरक्षा भिंत, पार्किंग परिसराचा विकास करण्यासाठी परवानगी मागितली होती. ते तीन लाखांचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे. त्यासोबतच पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केल्यानुसार या परिसरात मकबऱ्याच्या संदर्भात आणखी काही अवशेष सापडतात का यासाठी उत्खनन सुरू आहे. उत्खननात आढळून आलेले स्ट्रक्चरचे संवर्धन करून पुढील संरक्षक भिंतीचे काम केले जाणार आहे. असे पुरातत्व सर्वेक्षणकडून सांगण्यात आले.

----

स्ट्रक्चर पुढे वाढल्यास सायंटिफीक क्लिअरन्स करू

---

एस्क्लेव्हेशन, सायंटिफीक क्लिअरन्स, डेब्रीज क्लिअरन्स (मलबा साफ करणे) अशी उत्खननाची वर्गवारी असते. मकबरा परिसरात संरक्षक भिंतीसाठी परवानगी मिळाली असून, सर्कलस्तरावर ४० मीटर बाय ४० मीटर मलबा हटविण्याचे काम हाती घेतले आहे. दररोज ४ ते दहा लोक काम करत आहेत. आतापर्यंत स्नानगृह, स्वच्छतागृहाचा पाया सापडला आहे. हे स्ट्रक्चर पुढे वाढत गेल्यास सायंटिफीक क्लिअरन्स करावे लागेल. त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च आता सांगणे अशक्य आहे.

-डॉ. मिनल कुमार चावले, अधीक्षक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, औरंगाबाद विभाग

--

Web Title: Open the base of the bathroom, toilet in the excavation in front of the tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.