सोमवारी दुपारनंतर पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:44 AM2017-08-22T00:44:40+5:302017-08-22T00:44:40+5:30
दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकºयांच्या चेहºयावर हसू दिसून येत आहे. सोमवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकºयांच्या चेहºयावर हसू दिसून येत आहे. सोमवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी ६३ पैकी ३५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. रविवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. परंतु मध्यरात्रीनंतर काही भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली. सकाळी कमी-जास्त पाऊस होत होता.
दुपारनंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली होती. मागणी २४ तासांत जिल्ह्यात ४०.१० मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६७.६० मि.मी. एवढी नोंद झाली आहे. सार्वाधिक पाऊस आष्टी (८२.२९) तालुक्यात आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद धारूर (१६.३३) तालुक्यात झाली आहे. सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.