अधिष्ठातांनी केले घाटी रुग्णालयाचे 'ऑपरेशन'; गैरहजर कर्मचारी, अस्वच्छता पाहून नाराज
By संतोष हिरेमठ | Published: November 14, 2022 01:46 PM2022-11-14T13:46:30+5:302022-11-14T13:47:08+5:30
स्वछता कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असल्याचे निदर्शनास आले.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) नवनियुक्त डॉ. संजय राठोड यांनी सोमवारी सकाळीच अपघात विभाग, ओपीडी, वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी अस्वच्छता पाहून आणि कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यात सुधारणा करण्याची सक्त सूचना त्यांनी केली.
डॉ. संजय राठोड यांनी शुक्रवारी अधिष्ठातापदाचा पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी प्रथमच सोमवारी घाटी रुग्णालयात सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यादरम्यान अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. स्वछता कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असल्याचे निदर्शनास आले. जागोजागी तंबाखू, गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्णालयात तंबाखू , गुटखा कोणी येणार नाही, यासाठी कडक पाऊल उचलण्याचा निर्णय डॉ. राठोड यांनी घेतला.