आजपासून अवैध वाहतुकीवर कारवाईं
By Admin | Published: July 25, 2016 12:51 AM2016-07-25T00:51:01+5:302016-07-25T01:07:25+5:30
औरंगाबाद : गिरिजा नदीच्या पुलावरून कोसळलेल्या टेम्पोच्या अपघातानंतर २५ जुलैपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
शेताला तळ्याचे स्वरूप : राळेगाव तालुक्यात शनिवारी ५० मिमी. पाऊस
राळेगाव : परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे २०० हेक्टर क्षेत्रातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. नाल्याचे पाणी शिरल्याने काही शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. एकाच दिवसाच्या पावसाची नोंद ५० मिमी एवढी करण्यात आली आहे. शेताचे बांध फोडून पाणी बाहेर निघाल्याचे प्रकारही परिसरात घडले आहे.
तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. थोड्याफार विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात होत आहे. परिसरातील नाले भरून वाहात आहे. शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे यात भर पडली आहे. दुपारपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. नाल्याचे पाणी शेतात शिरले. जवळपास २०० हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचा अंदाज आहे.
केनाडी नाल्याला आलेल्या पुरामुळे वाऱ्हा, मेंगापूर, बोरी, आष्टा, संगम या पाच गावांचा राळेगावशी संपर्क तुटला होता. पाच तास पर्यंत नाल्यावर पूर कायम राहिल्याने राळेगाव येथून आपल्या गावी जाण्यासाठी निघालेले नागरिक अडकून पडले होते. पुराचे पाणी शिरल्याने दिलीप अराडे, कवडू राऊत, मंगला गिरी, अन्नाजी फाळके, सुरेश जुनघरे, योगेश रोकडे, पांडुरंग निवल, दिलीप उरकुडे, संजय इंगळे, सुखाराम लोहकरे, दिगांबर भूत यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पीक पाण्याखाली आल्याने उत्पन्नाची शक्यता मावळली आहे. (प्रतिनिधी)
नवीन रस्त्यावरील डांबर उखडले
पावसामुळे परिसराच्या अनेक भागातील रस्त्यावरील डांबर उखडले आहे. आधीच असलेल्या खड्ड्यांचा पसारा वाढला आहे. जवळपास एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी चांगल्या भागाचा शोध घ्यावा लागतो. पुराचे पाणी असलेल्या भागातील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. सध्यातरी या रस्त्याच्या दुरुस्तीची कुठलेही चिन्ह नाही.
राळेगावातील प्रमुख अधिकारी बाहेरगावी
पूरपरिस्थिती लक्षात घेता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहे. शनिवारी परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली होती. परंतु विभाग आणि तालुक्याचे कुठलेही प्रमुख अधिकारी मुख्यालयी नव्हते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार हे पुणे येथे यशदाच्या मिटींगला होते, असे सांगण्यात आले. तहसीलदार हेमंत गांगुर्डे अमरावती येथे असल्याची माहिती देण्यात आली. कुठलाही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला. मंडळ अधिकारी, तलाठ्यांनाच मोर्चा सांभाळावा लागला. पंचनामा आदी कारवाई त्यांनी पार पाडली.